भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटू सध्या या स्पर्धेत व्यस्त आहेत. पण, ही स्पर्धा झाल्यानंतरही भारतीय क्रिकेटपटूंना फार काळ निवांत वेळ मिळणार नाही. कारण, भारतीय क्रिकेट संघाचे पुढील वेळापत्रक देखील बरेच व्यस्त असणार आहे. आयपीएल २०२२ हंगामानंतर भारतीय संघाला परदेशी दौऱ्यांवर जायचे आहे.
आयपीएल २०२२ हंगाम संपला की सर्वात प्रथम भारतीय संघ (Team India) मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारताला युरोप दौऱ्यावर जायचे आहे. त्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर (India’s West Indies Tour) जाणार असल्याचे समोर येत आहे. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार वेस्ट इंडिजच्या या दौऱ्यात भारतीय संघ तीन वनडे आणि पाच टी२० सामने खेळणार आहे.
असे असेल वेळापत्रक
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील तीन सामने २२, २४ आणि २७ जुलै दरम्यान क्विन्स पार्क ओव्हल येथे ब्रायन चार्ल्स लारा स्टेडियम येथे होतील. या ठिकाणीच टी२० मालिकेतील पहिला सामना २९ जुलै रोजी खेळवला जाईल. त्यानंतर सेंट किट्स आणि नेविसमधील वॉर्नर पार्क येथे १ आणि २ ऑगस्ट रोजी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा टी२० सामना खेळवला जाईल. चौथा आणि पाचवा टी२० सामना अनुक्रमे ६ आणि ७ ऑगस्टला फ्लोरिडामध्ये खेळवला जाईल (West Indies vs India).
पूरन करणार नेतृत्व
दरम्यान, या मालिकांमध्ये वेस्ट इंडिजचे नेतृत्व करताना निकोलस पूरन दिसणार आहे. कारण, काहीदिवसांपूर्वीच कायरन पोलार्डने वेस्ट इंडिजच्या मर्यादीत षटकांच्या संघाचे नेतृत्व सोडले आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी वेस्ट इंडिजने वनडे आणि टी२० संघाच्या नेतृत्वाची धूरा निकोलस पूरनच्या हाती दिली आहे.
भारताचा युके दौरा
भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेनंतर जून-जुलै दरम्यान इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यावर जायचे आहे. भारत २६ आणि २८ जूनला डब्लिन येथे आयर्लंडविरुद्ध दोन टी२० सामने खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ एक कसोटी, तीन टी२० आणि ३ वनडे सामने खेळणार आहे. भारताचा इंग्लंड दौरा १ जुलै ते १७ जुलै दरम्यान होणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबईविरुद्ध सामना गमावला, पण गुजरातसाठी साहा-गिल जोडी ठरली ‘लय भारी’; रचली ऐतिहासिक भागीदारी
रेकॉर्ड ब्रेक मॅच! गुजरात- मुंबई सामन्यामध्ये रचले गेले ‘हे’ ११ विक्रम, टाका एक नजर