भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणमच्या वायझॅक स्टेडियमवर खेळला जात आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 396 धावांपर्यंत मजल मारली. प्रतुत्तरात इंग्लंड संघ पहिल्या डावात 253 धावांवर सर्वबाद झाला. जसप्रीत बुमराह याने भेदक गोलंदाजी करत सर्वाधिक 6 विकेट्स नावावर केल्या. इंग्लंडसाठी सलामीवीर झॅक क्रॉली याने सर्वाधिक 76 धावांची खेळी केली. भारतीय संघ 143 धावांनी आघाडीवर आहे.
इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी केली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 112 षटकात 396 धावा कुटल्या. प्रत्युत्तारत इंग्लंडने 55.5 षटकात 253 धावा केल्या. सलामीवीर झॅक क्रॉली याने 78 चेंडूत 76 धावाची सर्वोत्तम खेळीया डावात इंग्लंडला करून दिली. तसेच कर्णधार बेन स्टोक्स याने 47 धावांची दुसरी सर्वोत्तम खेळी केली. बेन टकेत 21, ओली पोप 23, जो रुट 5, जॉनी बेअरस्टो 25, बेन फोक्स 6, रेहान अहमद 6, टॉम हार्टली 21आणि जेम्स अँडरसन 6 धावा करून विकेट गमावली. शोएब बशीर 8* धावा करून नाबाद राहिला.
Innings Break!
England are all-out for 2⃣5⃣3⃣
6⃣ wickets for vice-captain @Jaspritbumrah93
3⃣ wickets for @imkuldeep18
1⃣ wicket for @akshar2026Scorecard ▶️ https://t.co/X85JZGt0EV#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/wb4s7EXIuu
— BCCI (@BCCI) February 3, 2024
भारतासाठी जसप्रीत बुमराह याने 15.5 षटकात 45 धावा खर्च करून 6 विकेट्स नावावर केल्या. कुलदीप यादव याने 17 षटकात 71 धावा खर्च करून 3, तर अक्षर पटेल याने 4 षटकात 24 धावा देत एक विकेट घेतली. मुकेश कुमार याने 44, तर रविचंद्रन अश्विन याने 61 धावा खर्च केल्या. पण या दोघांना एकही विकेट मिळाली नाही.
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार, कुलदीप यादव
इंग्लंड – झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रुट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.
महत्वाच्या बातम्या –
जसप्रीत बुमराहचा नाद यॉर्कर! स्टंप्स हवेत उडाल्यानंतर ओली पोप भलताच नाराज, पाहा VIDEO
U19 World Cup 2023 । अजिंक्य राहत भारताची उपांत्य सामन्यात धडक, इतर दोन संघांनीगी गाठली पुढची फेरी