भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड येथे सुरु असलेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर विजय मिळवून गुणतक्त्यात पहिला क्रमांक मिळवला आहे.
सध्या भारताच्या नावावर ३ सामन्यात ३ विजय असून भारताच्या खात्यावर एकूण गुण आहेत ६. ऑस्ट्रेलिया महिला संघाच्या नावावरही तीन सामन्यात तेवढेच गुण आहेत. परंतु भारतचा नेट रन (धावगती) सरस असल्याकारणाने भारत सर्व संघात सध्या अव्वल आहे.
भारताने पहिल्या सामन्यात यजमान इंग्लंड विरुद्ध तर दुसऱ्या सामन्यात विंडीज विरुद्ध सफाईदार विजय मिळवला आहे. त्यांनतर काल झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातही चमक दाखवत भारताने सलग तिसरा विजय मिळवला.
भारताचा पुढील सामना ५ जुलै रोजी श्रीलंका संघाविरुद्ध असून लंकेला पहिल्या तीनही सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.