INDvsSA: भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा येत्या 10 डिसेंबरपासून टी20 मालिकेने सुरू होत आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांची टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. यासाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे. या ताफ्यात भारताच्या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात अधिकतर युवा खेळाडूंचाच समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेत खेळाडूंचे जंगी स्वागत केले गेले. बीसीसीआयने नुकताच यादरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
डोक्यावर बॅग घेऊन धावले खेळाडू
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत सर्व खेळाडूंचा प्रवास दाखवण्यात आला आहे. सर्व खेळाडू या प्रवासादरम्यान मजा-मस्ती करताना दिसत आहेत. जेव्हा भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला पोहोचला, तेव्हा पाऊसही पडत होता. यादरम्यान खेळाडू आपल्या डोक्यावर बॅग घेऊन धावताना दिसले.
खरं तर, विमानतळावर उतरल्यानंतर बसमध्ये बसण्यासाठी खेळाडू स्वत:ला पावसात भिजण्यापासून वाचवण्यासाठी डोक्यावर बॅग घेऊन धावत होते. या दौऱ्याची सुरुवात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेने होणार आहे. टी20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव करणार आहे. अशात सूर्या आपल्या नेतृत्वाखाली या मालिकेत काय कमाल करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
South Africa bound ✈️🇿🇦#TeamIndia are here 👌👌#SAvIND pic.twitter.com/V2ES96GDw8
— BCCI (@BCCI) December 7, 2023
दौऱ्याचे वेळापत्रक
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील प्रथम 3 सामन्यांच्या टी20 मालिकेचे वेळापत्रक पाहूयात. मालिकेतील पहिला टी20 सामना 10 डिसेंबर रोजी डर्बनमध्ये खेळला जाईल. तसेच, दुसरा सामना 12 डिसेंबर रोजी सेंट जॉर्ज पार्कमध्ये खेळला जाईल. त्यानंतर मालिकेतील तिसरा सामना 14 डिसेंबर रोजी जोहान्सबर्गमध्ये पार पडेल.
यानंतर 3 सामन्यांच्या वनडे मालिकेचा पहिला सामना जोहान्सबर्गमध्ये 17 डिसेंबर रोजी, दुसरा सामना सेंट जॉर्ज पार्कमध्ये 19 डिसेंबर आणि तिसरा सामना पार्लमध्ये 21 डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे. याव्यतिरिक्त उभय संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 26 ते 30 डिसेंबरदरम्यान सेंच्युरियन येथे पार पडेल. तसेच, मालिकेतील दुसरा सामना 3 ते 7 जानेवारीदरम्यान केप टाऊन येथे पार पडेल. (India tour for South Africa india vs south africa bcci shared video of team india reached africa see here)
हेही वाचा-
कहर! मोहम्मद आमिरचे उच्च कोटीचे प्रदर्शन, फक्त 1 ओव्हरमध्ये ‘एवढ्या’ फलंदाजांना धाडलं तंबूत
Gautam Gambhir And S Sreesanth Fight: वादानंतर श्रीसंतचा गंभीरवर आरोप; म्हणाला, ‘तो तर वीरू भाई…’