भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना 26 डिसेंबरला खेळला जाणार आहे. या दुसर्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केला जाऊ शकतो. बीसीसीआयने बुधवारी (23 डिसेंबर) एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामधे भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सराव करताना दिसत आहे. त्यामुळे दुसर्या कसोटी सामन्यात जडेजाला संधी मिळेल, अशी सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज मोहमद शमी या मालिकेतून बाहेर पडले आहेत. विराट कोहली हा पालकत्व रजा घेत मायदेशी परतला आहे, तर मोहम्मद शमीला मनगटात फ्रॅक्चर झाले आहे. कोहलीऐवजी भारतीय संघाचे नेतृत्त्व अजिंक्य रहाणे करणार आहे.
See, who is back in the nets. @imjadeja is here and has started preparing for the Boxing Day Test. #TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/skKTgBOuyz
— BCCI (@BCCI) December 23, 2020
ऑस्ट्रेलिया संघाने मागील आठवड्यात ऍडलेड येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला 8 विकेट्सने पराभूत केले होते. या सामन्यात भारताचा संघ दुसर्या डावात 36 धावात गारद झाला होता.
असे म्हटले जात आहे की, दुसर्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजाला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते. यामुळे भारतीय संघाला बळकटी मिळणार आहे. कारण जडेजा गोलंदाजीबरोबर फलंदाजीमध्येही कमाल करू शकतो. आपल्या कारकिर्दीत त्याने 49 कसोटी, 168 वनडे आणि 50 टी-20 सामने खेळले आहेत. त्यामुळे संघ व्यवस्थापक जडेजावर विश्वास दाखवू शकतात.
आतापर्यंत जडेजाने कसोटी कारकीर्दीत 35.26 च्या सरासरीने 1869 धावा काढल्या आहेत. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत एकमात्र शतक ठोकले आहे. त्याचबरोबर 14 अर्धशतके लगावले आहेत. तसेच, कसोटीत गोलंदाजी करताना त्याने 213 विकेट्स घेतल्या आहेत.
टी-20 मालिकेच्या पहिल्या सामन्यात जडेजाच्या डोक्याला चेंडू लागल्याने त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो उर्वरित दोन सामन्यात आणि पहिल्या कसोटीत सहभागी झाला नव्हता. मात्र, बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, जडेजा सराव करताना दिसून येत आहे. त्यामुळे असे वाटत आहे की, तो पूर्णपणे फिट आहे आणि दुसर्या कसोटी खेळू शकतो. जर जडेजाला संघात स्थान मिळाले, तर हनुमा विहारीला संघाबाहेर बसावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
डेव्हिड वॉर्नर बनलाय डॉन, बघा संपूर्ण व्हिडिओ
व्हिडिओ: ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात रवींद्र जडेजा खेळणार? करतोय कसून सराव
‘हा’ भारतीय करू शकतो मेलबर्नमध्ये कसोटी पदार्पण; बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ