---Advertisement---

रिकी पाँटिंगने पृथ्वी शॉबद्दल केलेली ‘ही’ भविष्यवाणी ठरली खरी

On: शुक्रवार, डिसेंबर 18, 2020 12:16 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला क्रिकेटबद्दल खूप अनुभव आहे. त्याने ऑस्ट्रेलिया संघाला दोन वेळा आपल्या नेतृत्त्वाखाली विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद मिळवून दिले आहे. त्याने अशा संघाचे नेतृत्त्व केले आहे, ज्या संघाने जगभरात आपल्या विजयाचा डंका वाजवला आहे. पाँटिंगला खेळातील किती ज्ञान आहे, याची प्रचिती भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात दिसली.

पाँटिंगने भारतीय संघाचा सलामी फलंदाज पृथ्वी शॉसोबत बराच वेळ घालवला आहे. पाँटिंग आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रशिक्षक आहे आणि पृथ्वी त्या संघाचा प्रतिनिधी. पाँटिंगने शॉ कशाप्रकारे बाद होऊ शकतो, याची अचूक भविष्यवाणी केली होती.

पाँटिंगची भविष्यवाणी ठरली अचूक
जेव्हा भारतीय संघाचा डाव सुरू झाला होता, तेव्हा पाँटिंग समालोचन करत होता. त्याने समालोचन करताना उल्लेख केला होता की शॉला आत येणार्‍या चेंडूवर खेळताना अडचण येते. तो तसा म्हणाला आणि मिचेल स्टार्कने शॉला दुसरा चेंडू तसाच टाकला आणि शॉ बाद झाला.

शॉच्या फलंदाजीमध्ये ही आहे कमी
पाँटिंग म्हणाला होता, “जर शॉच्या फलंदाजीमध्ये काही कमी आहे, तर ती आत येणारा चेंडू. तो नेहमी बॅट आणि पॅड यांच्यात खूप सूट ठेवतो. या ठिकाणीच ऑस्ट्रेलियन गोलंदाज लक्ष्य करतील.”

https://twitter.com/MFutrey/status/1339608007991119872

https://twitter.com/natunaren/status/1339617987364458496

असे बाद झाले शॉ आणि मयंक
शॉच्या बाद होण्याबद्दल बोलायचे, तर तो स्टार्कचा गुड लेंथवर टप्पा पडून चेंडू आत आला. यावर शॉने फूटवर्क विना चेंडूला ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटची आतील कड घेत मधल्या यष्टीवर जावून आदळला. तो बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर तो ट्रेंड होऊ लागला. लोकांनी मिळून त्याच्यावर निशाणा साधला. भारताला दुसरा धक्का पॅट कमिनसने मयंक अग्रवालला त्रिफळाचीत करत दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

दुर्दैव! तब्बल १७ वर्षानंतर भारतीय कर्णधारासोबत ऑस्ट्रेलियात घडली ‘अशी’ घटना

‘सर्व कसोटी सामन्यात केला पाहिजे ‘या’ चेंडूचा वापर’, महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे मत

दिग्गजांच्या मांदियाळीत सामील झाला विराट; केली ‘ही’ अचाट कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---