भारत आणि इंग्लंड संघादरम्यान ऑगस्ट 2021 मध्ये इंग्लंड येथे 5 कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. भारतीय संघ जवळजवळ तीन वर्षांनंतर इंग्लंडचा दौरा करणार असल्याने सर्व क्रिकेटप्रेमींमध्ये याबद्दल उत्सुकता बघायला मिळत आहे. यादरम्यानच बातमी समोर येत आहे की भारतीय संघ मालिका सुरू होण्यापूर्वी भारत अ विरुद्ध दोन सराव सामने खेळणार आहे.
भारतीय संघ नॉटिंघम येथे भारत अ विरुद्ध सराव सामने खेळणार आहे. भारतासाठी फायद्याची गोष्ट म्हणजे मालिकेतील पहिला कसोटी सामना देखील नॉटिंघम येथेच होणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला तेथील परिस्थितीशी जुळवून घेणे फायद्याचे ठरणार आहे.
भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील पहिला कसोटी सामना 4 ऑगस्ट पासून नॉटिंघम येथे पार पडणार आहे. दुसरा सामना 12 ऑगस्टपासून लंडन येथे तर तिसरा सामना 25 ऑगस्ट रोजी लिड्स येथे सुरू होणार आहे. चौथा सामना 2 सप्टेंबर रोजी पुन्हा लंडन येथे तर पाचवा सामना 10 सप्टेंबर रोजी मॅंचेस्टर येथे सुरू होणार आहे.
भारतीय संघाने 2018 साली झालेल्या इंग्लंड दौऱ्यात आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकली होती. मात्र, महत्त्वाच्या क्षणी संघाला उत्तम कामगिरी करता न आल्याने 4-1 ने मोठा पराभव सहन करावा लागला होता. भारतीय संघ जरी चार कसोटी सामन्यात पराभूत झाला असला तरी त्यांनी प्रत्येक कसोटी सामन्यात इंग्लंडला पूर्ण आव्हान दिले होते. भारतीय क्रिकेट प्रेमींना आशा असेल की आगामी दौऱ्यात भारतीय संघ उत्तम कामगिरी करत मालिका विजय मिळवेल.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडिया थँक्यू! ‘हा’ फोटो शेअर करत नॅथन लायनने मानले आभार
सौरव गांगुलीच्या झाल्या अनेक चाचण्या; हॉस्पिटलने दिले प्रकृतीबाबत मोठे अपडेट्स
आर अश्विन, रिषभ पंतसह पाच भारतीय खेळाडू ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी शर्यतीत