fbpx
Tuesday, April 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सौरव गांगुलीच्या झाल्या अनेक चाचण्या; हॉस्पिटलने दिले प्रकृतीबाबत मोठे अपडेट्स

January 28, 2021
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला बुधवारी(२७ जानेवारी) छातीत वेदना होत असल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर याच महिन्याच्या सुरुवातीला अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. हॉस्पिटलने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की गांगुलीची रुग्णालयाच्या अनेक चाचण्या झाल्या व त्याची प्रकृती स्थिर आहे.

ओपोलो हॉस्पिटलने निवेदनात सांगितले होते की, “४८ वर्षीय गांगुली हृदयाची तपासणी करुन घेण्यासाठी आला होता. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर त्याच्या पॅरामीटर्समध्ये (तापमान, नाडी, श्वसन दर आणि रक्तदाब) कोणताही बदल झालेला नाही.”

गांगुलीवर गुरुवारी(२८ जानेवारी) एंजिओग्राफी होण्याची शक्यता आहे. डॉक्टर देवी शेट्टी यांच्या निदर्शनाखाली डॉक्टर अत्लाफ खान गांगुलीच्या हृदयाच्या धमनीमध्ये स्टेंट टाकणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.

याआधी ३ जानेवारीला सकाळी जिममध्ये व्यायाम करताना गांगुलीने छातीत दुखू लागल्याची तक्रार केली होती. त्यामुळे त्याला लगेचच कोलकातामधील वुडलँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्यावर अँजिओप्लास्टी पण करण्यात आली होती. त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यात ३ ब्लॉकेजेस असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिनीत एक स्टेंट टाकण्यात आला होता. त्यानंतर ५ दिवसांनी त्याला घरी देखील सोडले होते.

बुधवारी त्याने जेव्हा त्रास होत असल्याची पुन्हा तक्रार केली होती, तेव्हा त्याच्यासाठी कोलकाता पोलिसांनी त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहचवण्यासाठी ग्रीन कॉरिडोर बनवला होता.

सौरव गांगुलीची कारकिर्द – 

बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष गांगुलीने भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. त्याने १९९२ ते २००८ या कालावधीत भारताकडून क्रिकेट खेळले आहे. दरम्यान त्याने ३११ वनडे सामने खेळले असून ११३६३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २२ शतकांचा समावेश आहे. तसेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ११३ सामने खेळले असून ७२१२ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने एक द्विशतक आणि १६ शतके लगावली आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याची २०१९ साली बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून निवड झाली.

महत्त्वाच्या बातम्या –

आर अश्विन, रिषभ पंतसह पाच भारतीय खेळाडू ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी शर्यतीत

कचरा वेचणारा मुलगा ते ‘युनिव्हर्स बॉस’

मुंबई टू टीम इंडिया व्हाया केरळ! भारतीय संघात नेट बॉलर म्हणून निवड झालेल्या संदीप वॉरियरचा संघर्षमय प्रवास


Previous Post

आर अश्विन, रिषभ पंतसह पाच भारतीय खेळाडू ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी शर्यतीत

Next Post

टीम इंडिया थँक्यू! ‘हा’ फोटो शेअर करत नॅथन लायनने मानले आभार

Related Posts

Photo Courtesy: Screengrab/@RCBTweets
IPL

याला विमानातून खाली फेका रे! ‘मिस्टर नॅग्स’ची बडबड ऐकून विराटने दिला असा आदेश, पुढं काय झालं पाहा

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL.
IPL

जडेजाला मोलाचा सल्ला देत ‘कॅप्टनकूल’ने पुन्हा दाखवली नेतृत्त्वाची चुणूक, गावकरांनी ‘या’ शब्दात केलं कौतुक

April 20, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

त्याच्यात महान टी२० फलंदाजाची चिन्हे, तो आयपीएलचा सुपरस्टार आहे; कैफने ‘या’ फलंदाजाची केली स्तुती

April 20, 2021
Photo Courtesy: Instagram/@sakariya.chetan
IPL

‘ड्रीम विकेट’ घेतल्यानंतर सकारियाची धोनीशी भेट; म्हणाला, ‘तुमच्यासारखे दुसरे कोणीही नाही’

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@IPL/@cricketaakash
IPL

‘जेव्हा सुर्यास्त होतो, तेव्हा..’ समालोचक आकाश चोप्राने धोनीबद्दल केलं असं काही भाष्य, उडाली खळबळ!

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

नाणं उचला अन् खिशात टाका, गल्ली क्रिकेटची सवय का अजून काही; बघा संजू सॅमसनने काय सांगितलं?

April 20, 2021
Next Post

टीम इंडिया थँक्यू! 'हा' फोटो शेअर करत नॅथन लायनने मानले आभार

ऑगस्टमध्ये सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी दोन भारतीय संघांमध्येच रंगणार सामने

शुभमंगल सावधान! अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकर अडकला विवाहबंधनात, पाहा फोटो

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.