भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यासाठी गुरूवारी (१६ जून) रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारत पुर्वनियोजित कसोटी, वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. एजबस्टन येथे १ जुलैपासुन खेळल्या जाणाऱ्या या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये केएल राहुल (KL Rahul) याचा समावेश असून तो या दौऱ्यात सहभागी होणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राहुलने दुखापतीमुळे सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेमधून माघार घेतली आहे. यामुळे तो इंग्लंड दौऱ्यालाही मुकणार का? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. तो सध्या बंगळुरू येथे राष्ट्रीय क्रिकेट अकॅदमीमध्ये (एनसीए) उपचारासाठी गेला आहे. त्याच्या तंदुरूस्तीबाबत कोणतेच रिपोर्ट आले नाही.
राहुल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत दुखापतीमुळे एकही सामना न खेळता बाहेर झाला होता. या मालिकेत त्याला नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारताचे नेतृत्व दिले होते. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, राहुलची दुखापत पूर्णपणे ठीक झाली नाही. यामुळे तो इंग्लंच्या दौऱ्यासाठी कितपत तयार आहे हे सांगणे कठीण आहे.
राहुलने २०२१मध्ये लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक ठोकले आहे. हा सामना भारताने १५१ धावांनी जिंकला होता. तो जर या दौऱ्यात खेळला नाही तर भारतासाठी मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.
या दौऱ्यासाठी भारतीय संघाची एक तुकडी १६ जूनला मुंबईतून निघणार आहे. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), जसप्रीत बुमराह, चेतेश्वर पुजारा, मोहमद शमी आणि यांचा समावेश आहे. तर दुसरी तुकडी दक्षिण आफ्रिकेची पाचवी टी२० (१९ जून) झाल्यावर २० जूनला बंगळुर येथून लंडनला रवाना होणार आहे. यामध्ये प्रशिक्षक राहुल द्रविड, रिषभ पंत (Rishabh Pant) आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश आहे.
राहुल या सामन्यात मुकला तर भारतीय क्रिकेट मंडळाने त्याच्या जागी कोणाचीही घोषणा केली नाही. सतरा खेळाडूंच्या या संघात तीन सलामी खेळाडू उपस्थित आहेत. राहुल वगळता रोहित शर्मा आणि शुबमन गिल हे दोघे सलामीला येऊ शकतील.
कोविडमुळे भारताला इंग्लंडचा दौरा अर्धवट सोडावा लागला होता. त्यातील रद्द झालेला पाचवा आणि शेवटचा सामना मॅनचेस्टर येथे खेळला जाणार होता. या मालिकेत बारत २-१ने पुढे आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा, केएल राहुल (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंड दौऱ्यासाठी भारत तयार, कर्णधार रोहित, कोहली, बुमराहसह ‘हे’ खेळाडू मुंबईत; कधी पकडणार फ्लाईट?
रणजीच्या रणांगणात कोण मारणार बाजी? मुंबईकडे ४२वे जेतेपद जिंकण्याची संधी
अरेरे! दुसऱ्या कसोटी विजयासह मालिकाही खिशात घातलेल्या इंग्लंडला आयसीसीकडून दंड, २ गुणही कापले