इंग्लंड आणि भारत यांच्यात होणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यासाठी संघांची घोषणा करण्यात आली आहे. १६ जूनसाठी भारतीय संघ इंग्लंडला जाण्यासाठी रवाना होईल. या मालिकेत उर्वरित एक कसोटी सामना, ३ एकदिवसीय आणि ३ टी२० सामने खेळवले जातील. या मालिकेत भारताचे तीन खेळाडू इंग्लंडच्या संघाला गुडघ्यावर आणू शकतात.
१. चेतेश्वर पुजारा
कसोटी क्रिकेटसाठी प्रचलित असणारा चेतेश्वर पुजारा इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात खेळताना दिसणार आहे. पुजारा इंग्लंडची चिंता वाढवू शकतो. पुजाराचा भारतीय संघात पुन्हा समावेश करण्यात आला आहे. पुजारा सध्या काऊंटी क्रिकेट खेळत आहे, ज्यामध्ये त्याने २ शतकेही झळकावली आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून पुजारा इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर खेळत आहे. इंग्लंडचे हवामान आणि खेळपट्टी चांगलीच समजली असावी. पुजाराकडून संघासाठी चांगली खेळी अपेक्षित आहे. त्यामुळे तो या सामन्यात इंग्लंडचा काळ ठरू शकतो.
२. जसप्रीत बुमराह
जसप्रीत बुमराहने गेल्या वर्षी चार कसोटी सामन्यांमध्ये १८ बळी घेतले होते. कसोटीतील वेगवान खेळपट्ट्यांवर बुमराह चांगल्या लाईन लेंथसह चांगली गोलंदाजी करतो. बुमराह फलंदाजांना अडचणीत आणण्यात यशस्वी ठरतो. या वेळीही त्याच्याकडून या सामन्यात चांगल्या लाईन लेंथसह चमकदार कामगिरीची अपेक्षा असेल. बुमराहची गोलंदाजी सामन्यासाठी निर्णायक ठरू शकतो.
३. रविंद्र जडेजा
भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आयपीएलचा संघ चेन्नईसाठी काही खास करू शकला नाही. या मालिकेत तो भारतीय संघासाठी उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून उतरेल अशी अपेक्षा आहे. गेल्या ४ कसोटी सामन्यांमध्ये त्याने संघासाठी चांगली कामगिरी केली. आपल्या गोलंदाजीने आश्चर्यकारक कामगिरी करताना त्याने ४ सामन्यात ६ बळी घेतले. यावेळीही त्याच्याकडून उर्वरित कसोटीत चांगली कामगिरी अपेक्षित आहे.
दरम्यान, या तिनही खेळाडूंवर उरलेल्या एका कसोटी सामन्यांत विशेष नजर असणार आहे. यो तिघांच्या खेळीवर सामन्याचे भवितव्य अबलंबून असेल हे मात्र नक्की.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आता तुझे फॉलोव्हर्स वाढले असतील’, भारतीय दिग्गजाला पोलार्डने झापले, नंतर ट्वीटही केले डिलीट
राजस्थानसाठी बटलरसह ‘या’ तीन खेळाडूंनी गाजवलीये यंदाची आयपीएल, चोपल्यात सर्वात जास्त धावा
पहिले पाढे पंचावन्न..! लाख प्रयत्न करूनही आरसीबीच्या पदरी पुन्हा अपयशच