एकाच वेळी भारतीय संघ आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात आहेत. भारतीय संघाचे यावर्षीचे वेळापत्रक खूपच व्यस्त आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी२० विश्वचषक झाल्यावर भारतीय संघ (Team India) अनेक देशांचा दौरा करणार आहे. त्यातच न्यूझीलंड क्रिकेटने घरच्या मैदानावर मर्यादित षटकांच्या मालिकेची घोषणा केली आहे. यामध्ये भारतीय संघ टी२० विश्वचषक (T20 World Cup) झाल्यानंतर लगेचच न्यूझीलंडचा दौरा करणार आहे.
न्यूझीलंडच्या दौऱ्यात भारत तीन सामन्यांची टी२० मालिका आणि तेवढ्याच सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. टी२० मालिकेतील पहिला सामना १८ नोव्हेंबर आणि तिसरा सामना २२ नोव्हेंबरला खेळणार आहे. त्यानंतर वनडे मालिकेतील पहिला सामना २५ नोव्हेंबर आणि शेवटचा तिसरा सामना ३० नोव्हेंबरला खेळणार आहे.
भारताचे न्यूझीलंड दौऱ्यातील वेळापत्रक:
पहिली टी२० – १८ नोव्हेंबर
दुसरी टी२० – २० नोव्हेंबर
तिसरी टी२० – २२ नोव्हेंबर
पहिली वनडे – २५ नोव्हेंबर
दुसरी वनडे – २७ नोव्हेंबर
तिसरी वनडे – ३० नोव्हेंबर
सध्या भारताचा एक संघ आयर्लंडच्या दौऱ्यात दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. त्यातील पहिला सामना भारताने जिंकला असून दुसरा सामना २८ जून रोजी खेळला जाईल. आयर्लंडविरुद्धचे सामने संपल्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर असलेला भारताचा वरिष्ठ संघ १ जुलैपासून कसोटी सामना खेळणार आहे. मागच्या वर्षी कसोटी मालिकेतील शेवटचा सामना कोरोनाच्या कारणास्तव स्थगित केला गेला होता, जो यावर्षी खेळला जात आहे. या कसोटी सामन्यानंतर इंग्लंड आणि भारत यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळली जाईल. भारताचा इंग्लंड दौरा १७ जुलैला संपणार आहे.
या दोन टी२० मालिकेत खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंसाठी टी२० विश्वचषकामध्ये संघात स्थान निर्माण करण्याची संधी आहे. टी२० विश्वचषकाची सुरुवात १६ ऑक्टोबरला होणार असून अंतिम सामना १३ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल.
इंग्लंडच्या दौऱ्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्याला जाणार आहे. यामध्ये तीन वनडे आणि पाच टी२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. यातील पहिला वनडे सामना २२ जुलै आणि दौऱ्यातील शेवटचा टी२० सामना ७ ऑगस्टला खेळला जाणार आहे. भारतीय संघ आशिया कपसाठी श्रीलंकेला रवाणा होणार आहे. ही स्पर्धा २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरदरम्यान खेळली जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IREvsIND: ‘पंड्या एँड कंपनी’ मालिका जिंकणार की पाऊस करेल खेळ खराब? वाचा सविस्तर
ठरलयं! इ्ंग्लंड विरुद्धच्या कसोटीमध्ये ‘हाच’ खेळाडू करणार भारताचे नेतृत्व, स्वत: दिले संकेत
रोहित शर्माचे कर्णधारपद लवकरच जाणार, विरेंद्र सेहवागने दिले संकेत