---Advertisement---

टीम इंडिया १६ डिसेंबरला होणार दक्षिण आफ्रिकेला रवाना, ‘इतके’ दिवस राहणार बायो-बबलमध्ये

On: रविवार, डिसेंबर 12, 2021 5:33 PM
Team India
---Advertisement---

येत्या काही दिवसात भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने येणार आहेत. २६ डिसेंबरपासून या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडणार आहे. आधी या दौऱ्यातील सामन्यांना १७ डिसेंबरपासून सुरू होणार होती. परंतु, ऑमीक्रॉनची भीती पाहता, ही दौरा पुढे ढकलण्यात आला असून, टी२० मालिका स्थगित करण्यात आली आहे.

भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व विराट कोहली करणार आहे. तर उपकर्णधारपद रोहित शर्माच्या हाती देण्यात आले आहे. भारतीय संघ १६ डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ ४४ दिवस कडक बायो-बबलमध्ये राहणार आहे. ही मालिका २३ जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी १८ सदस्यीय खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे.

भारतीय कसोटी संघाचे उपकर्णधारपद यापूर्वी अजिंक्य रहाणेकडे होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून तो साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. ज्यामुळे त्याला संघात स्थान तर देण्यात आले आहे. परंतु त्याचे उपकर्णधारपद काढून घेण्यात आले आहे. त्याच्या ऐवजी रोहित शर्माला हे पद देण्यात आले आहे. तर रोहित शर्माला वनडे संघाचे कर्णधारपद देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

असा आहे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी भारताचा १८ सदस्यीय खेळाडूंचा संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टिरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.

असे आहे दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत मालिकेचे वेळापत्रक

कसोटी मालिका :
पहिला कसोटी सामना: २६-३० डिसेंबर २०२१ (सेंच्युरियन)
दुसरा कसोटी सामना : ३-७ जानेवारी,२०२२ (जोहान्सबर्ग)
तिसरा कसोटी सामना: ११-१५ जानेवारी,२०२२ (केपटाऊन)

वनडे मालिका 
पहिला वनडे सामना: १९ जानेवारी,२०२१ (पार्ल)
दुसरा वनडे सामना: २१ जानेवारी,२०२१ (पार्ल)
तिसरा वनडे सामना : २३ जानेवारी, २०२१( केप टाऊन)

महत्वाच्या बातम्या :

त्या’ दौऱ्यानंतर पूर्णपणे खचून गेला होता विराट, रवी शास्त्रींचा उलगडा

भारतीय क्रिकेटचा युवराज घडवणारे ‘ड्रॅगन सिंग’

विराट कोहलीने पहिल्याच भेटीत अनुष्काला मारला होता टोमणा, स्वतःच केला मोठा खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---