India Tour of South Africa: भारतीय संघाने नुकत्याच पार पडलेल्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत ऑस्ट्रेलियाला 4-1ने पराभवाचा धक्का दिला. यानंतर आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेने होईल.
मालिकेतील पहिला सामना 10 डिसेंबर रोजी डर्बनच्या किंग्समीड क्रिकेट स्टेडिअम (Kingsmead, Durban) येथे खेळला जाणार आहे. कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या दौऱ्यात स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. तसेच, रिंकू सिंग, यशस्वी जयसवाल यांसारख्या खेळाडूंकडेही परदेशात आपला दम दाखवण्याची सुवर्णसंधी असेल. चला तर, टी20 सामन्यांची मालिका एकही रुपया खर्च न करता कशी पाहता येईल, हे जाणून घेऊयात…
कधी आणि कुठे खेळला जाईल भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिला टी20 सामना?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिला टी20 सामना रविवारी (दि. 10 डिसेंबर) खेळला जाईल. हा सामना डर्बनच्या किंग्समीड क्रिकेट स्टेडिअमवर पार पडेल.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिला टी20 सामना किती वाजता सुरू होईल?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात होणारा पहिला टी20 सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल. तसेच, नाणेफेक 7 वाजता होईल.
लाईव्ह प्रसारण कुठे पाहता येईल?
उभय संघातील पहिल्या टी20 मालिकेचे लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स चॅनेल्सवर पाहता येईल.
लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहायची?
भारताबाहेरील भारताच्या सामन्यांचे प्रसारण हक्क स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टारकडे आहेत. त्यामुळे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील टी20 मालिकेची लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी प्लस हॉटस्टार (Hotstar) ऍपवर पाहता येईल.
डर्बनची खेळपट्टी
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिला टी20 सामना डर्बनच्या किंग्समीड स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या मैदानावर वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीतून चांगला फायदा मिळतो. सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना स्विंगही मिळते, ज्यामुळे ते खूपच खतरनाक ठरतात. फलंदाजांसाठी या खेळपट्टीवर धावा बनवणे सोपे मानले जात नाही.
आकडे काय सांगतात?
डर्बनच्या या मैदानावर आतापर्यंत 22 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले गेले आहेत. यातील 11 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. तसेच, आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या 9 सामन्यात संघांनी विजय मिळवला आहे. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 153 राहिली आहे, तर दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या 135 राहिली आहे. सर्वाधिक धावसंख्येचा विचार केला, तर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या मैदानावर 6 विकेट्स गमावत 226 धावा केल्या होत्या. (india tour of south africa ind vs sa t20 series live telecast and streaming know about here)
हेही वाचा-
‘शमीसारखा गोलंदाज कुठलाच प्रशिक्षक बनवू शकत नाही’, भारताच्या हुकमी एक्क्याविषयी कुणी केले भाष्य?
भारताविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, अनुभवी गोलंदाज दुखापतीमुळे मालिकेतुन बाहेर