क्रिकेटविश्वातील अनेक खेळाडू सोशल मीडियावर सक्रिय आहेत. अनेकदा ते आपले फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. असेच काही मस्तीचे व्हिडिओ भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन याने शेअर केला आहे. धवन हा अनेकदा त्याच्या अनोख्या व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर करत असतो व चाहते त्याला चांगला प्रतिसादही देतात.
श्रीलंका दौऱ्यातील भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवनने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये शिखर धवन जिममध्ये कसरत करताना दिसत आहे. तो पुलअप करण्याच्या स्तिथीत उभा आहे. व्हिडिओमध्ये शिखर धवन या अवस्तेत स्थिर उभा राहतो. त्याला पाहून पहिल्यांदा असे भासते की, हा एक फोटो आहे. परंतु येथे तो आपल्या चाहत्यांसह मस्ती करताना दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी शिखर धवन अचानक आपल्या स्थिर स्थितीतून स्थानावरून हालतो. मग हे स्पष्ट होते की हा फोटो नाही तर शिखर धवन पुलअपची कृती करत स्टेच्यू अवस्थेत उभा होता.
सर्वांना हा फोटो आहे, असा आभास करवण्याचे हे अनोखे चॅलेंज पूर्ण केल्यानंतर शिखर धवन डान्स करताना दिसून येत आहे. तो हा श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे आणि सध्या पूर्ण संघ हा मुंबईच्या एका हॉटेलमध्ये विलिगीकरणामध्ये आहे.
शिखर धवनच्या या व्हिडिओवर सहकारी खेळाडू सूर्यकुमार यादवने एक टिप्पणी केली आहे. त्यांनी लिहले आहे कि, “..आणि हा सुंदर फोटो काढला कोणी?” यावर कर्णधार धवनने उत्तरामध्ये सूर्यकुमार यादवचे नाव घेत त्याला आभार मानले आहेत.
https://www.instagram.com/reel/CQfe12virzj/?utm_medium=copy_link
भारताचा हा श्रीलंका दौरा १३ जुलैपासून सुरु होईल. या दौऱ्यावर भारत श्रीलंकाविरुद्ध ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. अनुभवी भारतीय संघ हा सध्या इंग्लंडमध्ये आहे. परंतु श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय नियामक मंडळ (बीसीसीआय) ने दुसरा संघ जाहीर केला आहे. या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडला नेमण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
सलग दुसरा सामना जिंकत इंग्लंडने केले ‘लंकादहन’, टी२० मालिका घातली खिशात
INDvNZ: कर्णधार कोहलीचे टीकाकारांना सणसणीत प्रत्युत्तर; म्हणाला, ‘हा एक संघ नसून…’
PSLला मिळाला नवा विजेता, शोएबच्या आतिशी खेळीने मुल्तान सुल्तानचा ४७ धावांनी दणदणीत विजय