पर्थ। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात आज(15 डिसेंबर) दुसऱ्या दिवशी भारताने पहिल्या डावात दुसऱ्या सत्राखेर 32 षटकात 2 बाद 70 धावा केल्या आहेत.
भारताची पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली होती. भारताचा सलामीवीर फलंदाज मुरली विजयने तिसऱ्या षटकातच एकही धाव न करता विकेट गमावली. त्याला आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने त्रिफळाचीत केले.
त्यानंतर केएल राहुललाही सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जोश हेजलवूडने त्रिफळाचीत केले. त्याने 2 धावा केल्या. त्यामुळे चेतेश्वर पुजारा आणि भारताचा कर्णधार विराट कोहली फलंदाजीसाठी खेळपट्टी आले.
या दोघांनीही भारताचा डाव सांभाळताना दुसऱ्या सत्राखेर नाबाद 62 धावांची भागीदारी रचली आहे. विराट 37 आणि चेतेश्वर पुजारा 23 धावांवर नाबाद आहे.
तत्पुर्वी आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव 326 धावांवर संपुष्टात आला. आॅस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात अॅरॉन फिंच(50), मार्क्यूस हॅरिस(70) आणि ट्रेविस हेड(58) यांनी अर्धशतके केली.
भारताकडून जसप्रीत बुमराह(2/53), इशांत शर्मा(4/41), हनुमा विहारी(2/53) आणि उमेश यादव(2/78) यांनी विकेट घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या:
–सिक्कीमच्या फलंदाजाने असा काही पराक्रम केला आहे की ऐकून थक्क व्हाल!
–आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: मिशेल स्टार्कने दिला तिसऱ्या षटकातच टीम इंडियाला पहिला धक्का
–Video: सुपरमॅन कोहलीचा हा अफलातून झेल पाहिला का?