भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सध्या चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या नावाने खेळल्या जाणाऱ्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. उभय संघातील दुसरा सामना शुक्रवारी (17 फेब्रुवारी) दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर सुरू होईल. ऑस्ट्रेलियन संघ या सामन्यातून मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. मात्र, त्यांच्या पुढील आव्हान सोपे असणार नाही.
नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियाला एकतर्फी पराभव पत्करावा लागला होता. भारतीय संघाने अवघ्या तीन दिवसात विजय मिळवत मालिकेत आघाडी मिळवलेली. त्यानंतर दिल्ली कसोटी ऑस्ट्रेलिया संघ बरोबरी साधण्याच्या प्रयत्नात असेल. मात्र, यासाठी त्यांना प्रयत्नांची शर्थ करावी लागेल. कारण, या मैदानावरील भारतीय संघाची आतापर्यंतची आकडेवारी ऑस्ट्रेलियासाठी त्रासदायक ठरू शकते.
भारतीय संघाने या मैदानावर मागील 36 वर्षांपासून कसोटी सामना गमावलेला नाही. 1987 मध्ये वेस्ट इंडीजने भारताला अखेरच्या वेळी या मैदानावर पराभूत केलेले. भारतातील एकाच मैदानावर सर्वाधिक कसोटी जिंकण्याच्या बाबतीत दिल्ली संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहे. भारताने दिल्ली व कोलकाता येथे प्रत्येकी 13 कसोटी सामने जिंकले आहेत. भारताने सर्वाधिक 15 कसोटी सामने चेन्नई येथील चेपॉक मैदानावर जिंकले आहेत.
भारतीय संघ दिल्ली स्थित या मैदानावर 1948 पासून कसोटी सामने खेळत आहे. या मैदानाला पूर्वी फिरोज शाह कोटला स्टेडियम या नावाने ओळखले जात होते. त्यानंतर 2020 मध्ये या स्टेडियमचे नामकरण अरुण जेटली स्टेडियम असे केले गेले. भारताने या स्टेडियमवर आतापर्यंत 34 सामने खेळले असून त्यापैकी तेरा सामन्यात विजय मिळवला आहे. तर, 15 सामने अनिर्णित राहिले आहेत. तर सहा सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही ही खेळपट्टी फिरकीपटूंना मदतगार ठरल्यास भारतीय संघ विजय संपादन करू शकतो.
(India V Australia Team India Great Record On Arun Jaitley Stadium In Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ना भुवी ना चहल! टी20 मध्ये बळींचे शतक बनवणारी पहिली भारतीय बनली दिप्ती
अय्यरचे दिल्लीमध्ये होणार टीम इंडियात कमबॅक? ‘या’ खेळाडूचा पत्ता कट






