भारत विरुद्ध पाकिस्तान संघ विश्वचषक 2023 स्पर्धेतील 12 व्या सामन्यात समोरासमोर आले आहेत. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळला जातोय. तत्पूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने जिंकली असून, प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर दोन्ही देशांचे राष्ट्रगीत गायले गेले. तेव्हा भारताचे राष्ट्रगीत तब्बल सव्वा लाख लोकांनी एकमुखाने गायले.
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे हा सामना खेळला जातोय. या मैदानाची एकूण आसनिक क्षमता तब्बल एक लाख 32 हजार इतकी दिसून येते. या सामन्यासाठी केवळ 4000 पाकिस्तानी प्रेक्षकांना भारत सरकारने व्हिजा मंजूर केला होता. त्यामुळे मैदानावर जवळपास सर्वच भारतीय प्रेक्षक दिसून आले.
GOOSEBUMPS 🇮🇳🇮🇳
– National anthem of India….!!!pic.twitter.com/M8rrHm5KVf
— Johns. (@CricCrazyJohns) October 14, 2023
भारताचे राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर भारतीय खेळाडूंसह मैदानावर उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांनी एका सुरात हे राष्ट्रगीत म्हटले. यापूर्वी मागील वर्षी झालेल्या टी20 विश्वचषकात मेलबर्न येथे भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यावेळी जवळपास 80 हजार भारतीय प्रेक्षकांनी उपस्थित दर्शवली होती. त्यावेळी अशाच प्रकारचा नजारा पाहण्यात आला होता.
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
पाकिस्तान
अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ
(India v Pakistan India National Anthem In Narendra Modi Stadium)
हेही वाचा-
पाकिस्तानविरुद्ध भारताचा ‘हा’ गोलंदाज ठरेल गेमचेंजर; इंग्लंडच्या विश्वविजेत्या कर्णधाराला विश्वास
याला म्हणतात INDvsPAK सामन्याची क्रेझ! चाहत्यांनी स्टेडिअमबाहेर केली तुफान गर्दी, पाहा व्हिडिओ