बेंगलोरच्या चिन्नास्वीमी स्टेडियमवर सुरू झालेल्या एेतिहासिक कसोटी सामन्यात एक खास इतिहास घडला.
भारत-अफगानिस्तान कसोटी सामन्यात कसोटी क्रिकेटमध्ये निर्वासितांच्या छावणीत जन्मलेला अफगानिस्तानचा जावेद अहमदी कसोटि क्रिकेट खेळणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
अफगानिस्तानच्या जावेद अहमदीचा जन्म 1992 साली पेशावर येथिल निर्वासितांच्या छावणीत झाला. अफगानिस्तानमधील 1990 च्या दशकातील अंतर्गत कलहामुळे जावेदच्या वडिलांना आपला देश सोडून पेशावर येथिल निर्वासितांच्या छावणीत जावे लागले. तेथेच 2 जानेवारी 1992 साली जावेदचा जन्म झाला.
बुधवारी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राशी बोलताना जावेद अहमदीने पेशावरमधिल निर्वासितांच्या छावणीतील आठवनींना उजाळा दिला.
तो म्हणाला, “मला क्रिकेटची ओळख पेशावरमध्ये झाली, पण मी चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळायला अफगानिस्तानमध्ये परतल्यावर शिकलो.
क्रिकेट खेळण्यासाठी जी दृढता आणि लढाऊ वृत्ती लागते ती माझ्यामध्ये निर्वासितांच्या छावणीत रूजली.
अफगानिस्तान सारख्या युद्धाने ग्रासलेल्या देशातील लोकांसमोर आतंरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे कठीण नव्हे तर अशक्य होते. पण आमच्या ताकदीवर आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आम्ही आज इथेपर्यंत पोहचलो आहोत.
आयसीसीच्या विविध स्पर्धांमधील आमच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे प्रत्येक विजयाबरोबर आमच्या देशाचा ध्वज सन्मानाने फडकू लागला. याचबरोबर देशातीली लोकांमध्ये क्रिकेट बद्धलचे प्रेम रुजू लागले.”
2006 साली पेशावरमधिल शरणार्थी शिबिरातून जावेद अहमदीचे कुटूंब अफगानिस्तानला परतले.
2012 साली ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या अंडर-19 विश्वचषकात जावेद अहमदीने अफगानिस्तानचे कर्णधारपद भूषवले होते. या विश्वचषका दरम्यान अफगानिस्तान संघाचे प्रशिक्षक ऑस्ट्रेलियाचे माजी गोलंदाज जॉफ लॉसन होते. त्याची क्रिकेटमधिल प्रगती आणि याशाचे श्रेय जावेदने जॉफ लॉसन यांना दिले आहे.
पुढे तो म्हणाला, “गुरूवारी होणाऱ्या आमच्या पहिल्या कसोटी सामन्यात प्रतिस्पर्धी संघ भारत आहे. जगातिल सर्वोत्कृष्ट संघाबरोबर खेळन्यासाठी मी फार उत्सुक आहे.”
महत्त्वाच्या बातम्या:
–टाॅप ५- कसोटीच्या पहिल्याच दिवशी लंचपुर्वी शतकी खेळी करणारे खेळाडू
–न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटरने मोडला स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागचा विक्रम
–टाॅप४- या संघांसोबत केले आहे सर्वाधिक संघांनी कसोटी पदार्पण