मेलबर्न। भारताने शुक्रवारी(18 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात विजय मिळवत तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. भारताकडून या मालिकेत यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कारही देण्यात आला.
धोनीने या मालिकेत सलग तीन अर्धशतके केली आहेत. तो भारताकडून या मालिकेत सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज ठरला. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही धोनीचे कौतुक केले आहे. तिसऱ्या वनडे सामन्यानंतर बोलताना विराट म्हणाला, ‘भारतीय क्रिकेटसाठी धोनी इतके कोणी वचनबद्ध नाही.’
Nobody is more committed to Indian cricket than @msdhoni – @imVkohli#AUSvIND
— BCCI (@BCCI) January 18, 2019
तसेच पुढे विराट म्हणाल, ‘धोनीसाठी भारतीय संघ खूश आहे. तो आता लयीत आला आहे. कारण लयीत येण्यासाठी आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी तूमच्या धावा होणे महत्त्वाचे असते. विशेषत: जेव्हा तूम्ही खूप आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसता तेव्हा.’
‘बाहेर अनेक गोष्टी होत असतात. लोक अनेक गोष्टींविषयी चर्चा करतात पण अस व्यक्ती म्हणून आम्हाला माहित आहे की त्याच्याइतके कोणीही वचनबद्ध नाही. लोकांनी त्याला त्याचा वेळ द्यायला हवा. कारण त्याने देशासाठी खूप योगदान दिले आहे.’
‘त्यांनी त्याला काय गरजेचे आहे हे त्याचे त्यालाच ठरवू द्यावे. तो एक हुशार क्रिकेटपटू आहे आणि त्याला माहित आहे त्याच्यासाठी काय आवश्यक आहे. आम्ही संघ म्हणून त्याच्यासाठी खूप आनंदी आहोत.’
W.O.R.D Skipper! 👏👏
Captain @imVkohli on @msdhoni #TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/PkD5Q7nQQl— BCCI (@BCCI) January 18, 2019
याबरोबरच विराटने 5 वा क्रमांक हा धोनीसाठी योग्य असल्याचे म्हटले आहे. या क्रमांकावर तो खेळायला आला तर त्याला काही वेळही मिळेल आणि तो सामन्याच्या शेवटपर्यंत खेळूही शकतो, असे विराट म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-
–जयदेव उनाडकट कर्णधार असलेल्या सौराष्ट्र संघाने घडवला इतिहास…
–असा आहे टीम इंडियाचा २० दिवसांचा न्यूझीलंड दौरा
–एमएस धोनीच्या शानदार खेळीने रिकी पॉंटींगचाही विक्रम मोडीत