भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात उद्यापासून(24 फेब्रुवारी) दोन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. या सामन्यात भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला इतिहास घडवण्याची संधी आहे.
विराटने या सामन्यात 12 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 500 धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार करेल. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये हा टप्पा पार करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरेल.
आत्तापर्यंत कोणत्याही खेळाडूला आंतरराष्ट्रीय टी20मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 500 धावा करता आलेल्या नाही.
विराट हा आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सध्या सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी20 मध्ये खेळताना 14 सामन्यात 61 च्या सरासरीने 488 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 5 अर्धशतकांचाही समावेश आहे.
विराटला जानेवारी-फेब्रुवारी मध्ये पार पडलेल्या न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या टी20 मालिकेत विश्रांतीनंतर पुनरागमन करत आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज-
488 – विराट कोहली (14 सामने)
378 – जेपी ड्यूमिनी (15 सामने)
366 – कमरान अकमल (12 सामने)
335 – उमर अकमल (12 सामने)
313 – रोहित शर्मा (18 सामने)
महत्त्वाच्या बातम्या-
–पहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया
–हिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज
–विश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही