ऍडलेड येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. परंतु पृथ्वी शाॅसाठी हा सामना कोणत्या वाईट स्वप्नापेक्षा कमी ठरलेला नाही. पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसर्या दिवशी पृथ्वीने असे काही केले की ज्यामुळे कर्णधार विराट कोहली नाराज झाला. त्याने या युवा खेळाडूला शिवीगाळ केली. पृथ्वी शाॅने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर सोपा झेल सोडला. त्यामुळे पृथ्वीचे खराब क्षेत्ररक्षण पाहून कर्णधार विराट कोहलीच्या तोंडातून पृथ्वीबद्दल अपशब्द निघाले.
विराट कोहलीने पृथ्वीला केली शिवीगाळ
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 23 व्या षटकात जसप्रीत बुमराहाने मार्नस लॅब्यूशानेला उत्कृष्ट बाऊन्सर टाकला. लॅब्यूशानेने या चेंडूला पूल शॉट मारण्याचा प्रयत्न केला आणि हा चेंडू हवेत उडाला. स्क्वेअर लेगवर उभा असलेल्या पृथ्वीला हा झेल सोपा झेल घेण्याची संधी होती, परंतु तो झेल त्याने सोडला. हा झेल सुटल्यानंतर बुमराह हसू लागला. मात्र, कर्णधार विराट कोहलीकडून राहवले नाही आणि त्याने रागाच्या ओघात पृथ्वीला शिवीगाळ केली.
पहिला कसोटी सामना पृथ्वीसाठी ठरला वाईट स्वप्नाप्रमाणे
पृथ्वी शाॅसाठी पहिला कसोटी सामना वाईट स्वप्नापेक्षा काही कमी ठरला नाही. पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याला खाते सुद्धा उघडता आले नाही आणि खराब फटका खेळताना त्रिफळाचीत झाला. त्याच्यानंतर त्याने खराब क्षेत्ररक्षण केले. फक्त पृथ्वीनेच खराब क्षेत्ररक्षण केले नाही, तर भारतीय संघाने एकूण तीन झेल सोडले. जसप्रीत बुमराह आणि यष्टिरक्षक वृद्धीमान साहा हे दोघेसुद्धा मार्नस लॅब्यूशानेचा झेल घेण्यात अपयशी ठरले होते.
https://twitter.com/Dip_D_Rocker/status/1339845214656032768?s=19
विराट आणि अजिंक्यने घेतले उत्कृष्ट झेल
भारतीय संघाचे खेळाडू भले ही झेल सोडत होते, परंतु कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे या दोघांनी उत्तम क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर केला. अजिंक्यने स्लिपमध्ये स्टीव्ह स्मिथचा अप्रतिम झेल घेतला, तर विराट कोहलीने शॉर्ट मिड विकेटवर कॅमरॉन ग्रीनचा उत्तम झेल पकडला. त्यामुळे दुसर्या सत्रापर्यंत ऑस्ट्रेलिया संघाने पाच गडी गमावले.
महत्त्वाच्या बातम्या-
“…म्हणून ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरले अपयशी”, माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने सांगितले कारण
प्रकाशझोतात गुलाबी चेंडूने खेळणे सोपे नाही, ऑस्ट्रेलियन कर्णधाराची प्रतिक्रिया
अश्विनला गृहीत धरणे महागात पडले, माजी कर्णधाराचा ऑस्ट्रेलियाला घरचा आहेर