सिडनी | भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया कसोटी मालिकेला ६ डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. त्यापुर्वी परवापासून सुरुवात झालेल्या भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया ११ संघातील सराव सामन्यात भारतीय सलामीवीरांनी दुसऱ्या डावात धमाकेदार सुरुवात करुन दिली आहे.
पृथ्वी शाॅ दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याच्याऐवजी दुसऱ्या डावात केएल राहूल आणि मुरली विजय हे फलंदाज सलामीला आले. त्यांनी ३०.४ षटकांत १०९ धावांची भागिदारी केली. केएल राहुल ९८ चेंडूत ६२ धावा करुन तंबूत परतला तर मुरली विजय ९४ चेंडूत ५२ धावांवर खेळत आहे. त्याला ९ चेंडूत २ धावा करणारा हनुमा विहारी मैदानावर साथ देत आहे.
भारताने पहिल्या डावात केलेल्या ३५८ धावांना प्रत्यत्तर देताना आॅस्ट्रेलियाने ११ ने पहिल्या डावात ५४४ धावांचा डोंगर उभारला होता. त्यामुळे त्यांना १८६ धावांची मोठी आघाडी मिळाली होती. सध्या भारतीय संघ दुसऱ्या डावात ३३.३ षटकांत १ बाद ११७ धावांवर खेळत आहे. तसेच आॅस्ट्रेलियाला संघाकडे अजूनही ६९ धावांची आघाडी आहे. सामन्याचा आज शेवटचा दिवस असून शेवटची १२.३ षटके बाकी आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–हॉकी विश्वचषक २०१८: गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा आयर्लंडवर विजय
–विराट कोहलीची खेळातील परिपूर्णता मोनालिसाच्या पेंटीगसारखीच
–रमेश पोवारांची उचलबांगडी पक्की, बीसीसीआयने मागवले महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज?