भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला आज (२६ डिसेंबर) मेलबर्नच्या मैदानावर सुरुवात झाली. या सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या खेळावर भारताने वर्चस्व गाजवले. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने नाणेफेक गमावली. मात्र खेळपट्टी आणि वातावरणाचा फायदा घेत ऑस्ट्रेलियन संघाला अवघ्या १९५ धावांवर गुंडाळले. त्यांनतर फलंदाजी करताना दिवसाखेर १ बाद ३६ धावा भारताने केल्या आहेत.
भारतीय संघाच्या या अप्रतिम कामगिरीने चाहत्यांसह आजी-माजी खेळाडू देखील खुश झाल्याचे दिसले. भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग, माजी शैलीदार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण तसेच ऑस्ट्रेलियाचा माजी महान लेगस्पिनर शेन वाॅर्न यांनी ट्विट करत भारतीय संघाचे तोंडभरून कौतुक केले.
सेहवागने आपल्या ट्विटमध्ये भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेचे विशेष कौतुक केले. पहिल्या दिवसाच्या खेळावर प्रतिक्रिया देताना सेहवागने म्हंटले, “रहाणेकडून गोलंदाजांचा अचूक वापर आणि कल्पक क्षेत्ररचना. गोलंदाजांनी देखील अप्रतिम कामगिरी केली. बुमराह, अश्विन आणि सिराजचे दमदार प्रदर्शन. ऑस्ट्रेलियाला १९५ धावांवर सर्वबाद करणे, निश्चितच वाखाणण्याजोगे. आता फलंदाजांवर जबाबदारी आहे.”
Outstanding bowling changes and really smart fielding placements from Rahane.
And the bowlers delivered . Ashwin, Bumrah,Siraj were absolutely brilliant. Great effort to get Australia all out for 195 on the first day. Now for the batters to get a good first innings lead #AUSvIND— Virender Sehwag (@virendersehwag) December 26, 2020
व्हीव्हीएस लक्ष्मण देखील भारतीय संघाच्या कामगिरीवर खुश झाल्याचे दिसला. त्याने ट्विट करताना लिहिले, “भारतासाठी अतिशय उत्तम दिवस होता. गोलंदाजांनी पुन्हा एकदा चोख भूमिका बजावली. दोन्ही पदार्पणवीर देखील चांगल्या लयीत दिसले. रहाणेने अप्रतिम नेतृत्व केले. मुख्य म्हणजे अॅडलेडमधील पराभव भारताने मागे टाकलेला दिसला.”
Excellent days play for India. Bowlers were once again sensational, both the debutants looked confident, Rahane captained the side really well but most importantly they didn’t carry the baggage of the loss from Adelaide. #INDvAUS
— VVS Laxman (@VVSLaxman281) December 26, 2020
माजी महान लेगस्पिनर शेन वाॅर्नने भारतीय संघासह मेलबर्नच्या ग्राउंड स्टाफचेही कौतुक केले. “मेलबर्न मैदानात अशी अप्रतिम खेळपट्टी तयार केल्या बद्दल ग्राउंड स्टाफचे विशेष अभिनंदन. बॉक्सिंग डे कसोटीचा मेलबर्नवरील पहिला दिवस शानदार होता. भारतीय गोलंदाजांची दमदार कामगिरी आणि अजिंक्य रहाणेचे तेवढेच दमदार नेतृत्व! भारतीय संघ उद्याचा पूर्ण दिवस फलंदाजी करू शकेल का?”, असे वाॅर्नने आपल्या ट्विटमध्ये लिहिले.
What a terrific day of cricket at the MCG today. Congrats to the ground staff on preparing the best wicket at the MCG for a long time. More of these type of pitches please ! The Indian bowlers were outstanding too & very well lead by @ajinkyarahane88 ! Can India bat all day ?
— Shane Warne (@ShaneWarne) December 26, 2020
संबधित बातम्या:
– IND vs AUS : पहिल्या दिवसाखेर भारताच्या १ बाद ३६ धावा, पदार्पण करणाऱ्या शुबमन गिलची शानदार सुरुवात
– त्याची बॅट क्रीजच्या आत आलीच नव्हती, टीम पेनबाबत दिलेल्या चुकीच्या निर्णयावर शेन वॉर्नची प्रतिक्रिया
– व्वा! संघनायक असावा तर असा, ‘त्या’ एका कृतीने अजिंक्य रहाणेने जिंकली कोट्यवधी क्रिकेट रसिकांची मने