भारतीय संघाचा दमदार खेळाडू संजू सॅमसनने नुकतेच आपल्या फीटनेसवर खूप काम केले. याचा प्रत्यय ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आला. यजमान संघाविरुद्ध ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना मंगळवारी (८ डिसेंबर) सिडनी येथे झाला. या सामन्यात सॅमसनने आपल्या क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
ऑस्ट्रेलियाच्या डावातील १४ वे षटक टाकण्यासाठी भारतीय वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आला होता. त्यावेळी दुसऱ्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलने जोरदार फटका मारला. यादरम्यान मैदानात उपस्थित सर्व खेळाडूंना वाटले की, हा चेंडू षटकार जातोय की काय, परंतु तिथे अचानक सॅमसनने झेप घेतली.
सॅमसनने झेप घेत चेंडू झेलला, परंतु त्याला माहिती होते की तो बाऊंड्रीच्या पलीकडे जाईल. त्यामुळे त्याने हवेतच चपळतेने चेंडू मैदानाच्या आत फेकला. अशाप्रकारे मॅक्सवेलचा हा फटका षटकार जाण्यापासून सॅमसनने रोखला. या चेंडूवर मॅक्सवेलला केवळ २ धावा मिळाल्या.
Super Sanju 🔥
The hit from Maxwell was destined to go for six, before Sanju Samson made a sensational stop at the boundary!#AUSvIND pic.twitter.com/qneXSpHwYj
— ICC (@ICC) December 8, 2020
🏏
Just how good an athlete is Sanju Samson! 👌 pic.twitter.com/YBJ7qO8RoL
— The Cricket Wire (@TheCricketWire) December 8, 2020
या मालिकेतील पहिल्या टी२० सामन्यातही सॅमसनने स्टीव्ह स्मिथचा झेल पुढे उडी घेत झेलला होता.
:(:
Chachu caught by Chachu.#MixedFeelings | @IamSanjuSamson | #AUSvIND pic.twitter.com/Rz2f86Mqzr
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) December 4, 2020
मॅक्सवेलने या सामन्यात ३६ चेंडूत ५४ धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली. यात त्याने ३ चौकार आणि ३ षटकार ठोकले. शेवटी भारतीय संघाला या सामन्यात १२ धावांनी पराभव पत्करावा लागला.