---Advertisement---

भारतावर फॉलोऑनचे संकट, अर्धा संघ तंबूत परत, बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाचा वरचढ

---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एक अतिशय रोमांचक सामना झाला. स्टीव्ह स्मिथने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 34 वे शतक झळकावले. त्याच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 474 धावांची मोठी धावसंख्या उभारली. तर रोहित शर्मा या दौऱ्यावर प्रथमच सलामीवीर म्हणून आलाय पण सामन्यातही तो अपयशी ठरला. दुसरीकडे यशस्वी जयस्वालने दमदार अर्धशतक पूर्ण केले. मात्र तो शेवटी धावबाद झाला. त्याने आजच्या दिवशी भारताकडून सर्वाधिक 82 धावा केल्या.

तर विराट कोहलीही आज लयीत दिसला. पण यशस्वी बाद झाल्यानंतर त्याचे लक्ष आणि चौथ्या-पाचव्या स्टंपच्या चेंडूवर तो पुन्हा झेलबाद झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारताची धावसंख्या 164/5 अशी आहे. भारत आणखी सध्या 310 मागे आहे आणि फॉलोऑन वाचवण्यासाठी अजून 110 धावांची गरज आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने दमदार खेळ करत पहिल्या दिवसाच्या 311/6 धावसंख्येपासून संघाने 140 हून अधिक धावा जोडल्या. आतापर्यंत पहिल्या सत्रात फक्त एक विकेट पडली होती. पण ऑस्ट्रेलियाच्या उर्वरित तीन विकेट दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच पडल्या. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक स्टीव्ह स्मिथने 140 धावा केल्या, तर सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा आणि मार्नस लॅबुशेन यांनी अर्धशतकी खेळी खेळल्या. परिणामी संघाने एक मोठी धावसंख्या (474 ) उभारली.  गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने 4 विकेट्स घेतल्या.

भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला तेव्हा रोहित शर्मा सलामीवीर म्हणून खेळला. मात्र, तो अवघ्या 3 धावा करून बाद झाला. यानंतर केएल राहुल सलामीवीर यशस्वी जयस्वालला पाठिंबा देण्यासाठी आला. दोघांमधील भागीदारी बहरली, मात्र चहापानाच्या विश्रांतीपूर्वी शेवटच्या चेंडूवर पॅट कमिन्सने त्याला क्लीन बोल्ड झाले. यानंतर तिसऱ्या सत्रात विराट कोहली यशस्वीला साथ देण्यासाठी क्रीजवर आला. दोघांमध्ये 100 धावांची भागीदारी झाली. मात्र यशस्वी 82 धावा करून धावबाद झाला. विराट कोहलीही 36 धावा करून झेलबाद झाला. भारताची दिवसातील शेवटची विकेट आकाश दीपच्या रूपाने पडली.

हेही वाचा-
VIDEO; सुरक्षेचा घेरा तोडून विराटला भेटण्यासाठी थेट मैदानातच धावत सुटला चाहता
मोहम्मद सिराजचे ‘शतक’, बुमराह-आकाशदीपची अवस्था वाईट, गोलंदाजीत भारताची चिंताजनक कामगिरी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---