---Advertisement---

विराट! शेतकरी मोर्चात सहभागी हो, चिडून चाहत्याने केले आवाहन

On: गुरूवार, डिसेंबर 10, 2020 11:57 AM
---Advertisement---

सध्या भारतात दोन बाबींची प्रामुख्याने चर्चा होत आहे. एक म्हणजे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा व दुसरी म्हणजे कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलन. अनेक अभिनेते, पत्रकार, खेळाडूंनी शेतकरी मोर्चाला आपला पाठींबा दिलेला आहे. अशातच ऑस्ट्रेलियामधील प्रेक्षकाने विराटला देखील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

सिडनी येथे झालेला टी २० मालिकेतील शेवटचा सामना संपल्यानंतर विराट पव्हेलियनमध्ये जात असताना प्रेक्षकाने त्याला आवाज देत आवाहन केले. युवा प्रेक्षक विराटला आवाज देत म्हणाला, विराट तू शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दे’ तसेच या वेळी प्रेक्षकाने शेतकरी एकजुटीचे नारे देखील दिले. विराटने मात्र काहीही प्रतिक्रिया न देता पव्हेलियनमध्ये जाणेच पसंत केले.

दरम्यान शेतकरी आंदोलन सुरू असतानाच तिकडे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा देखील सुरू आहे. एकदिवसीय व टी २० सामन्यांच्या मालिकेनंतर बहुप्रतिक्षित ४ कसोटी सामन्यांची बॉर्डर – गावसकर मलिका १७ डिसेंबर पासून सुरु होत आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना झाल्यानंतर विराट पालकत्व रजा घेवून आपल्या पहिल्या आपत्याच्या जन्मासाठी भारतात परतणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तान क्रिकेटला अच्छे दिन, तब्बल १४ वर्षांनी हा संघ करणार पाकिस्तान दौरा
अजूनही निवृत्त झाला नाही २००३ क्रिकेट विश्वचषकातील हा हिरो, इतर सर्वांनी सोडले क्रिकेट
अन् क्रिकेटला सर्वस्व मानलेल्या पार्थिवची बारावीची परिक्षा हुकली…
शाहरुख खानच्या ५ क्रिकेटवरील जाहिराती, ज्यांनी एकवेळी घातला होता धुमाकूळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---