कोरोना या साथीच्या आजारामुळे बरेच दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले नव्हते. मात्र, सर्व खबरदारी घेऊन क्रिकेटच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. आता भारतीय संघही जैव सुरक्षित वातावरणात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांची मालिका खेळणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे आणि टी20 मालिकांनंतर 17 डिसेंबरपासून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात होईल. हा सामना नियोजित वेळापत्रकानुसार ऍडिलेड येथेच होणार आहे. खरंतर दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आणि तिथे परत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे हा सामना ऍडिलेडमध्येच होणार का? हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला होता.
‘सामना ऍडिलेड येथेच होणार’ याची नव्हती हमी
दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये कोरोना व्हायरसची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, राज्याचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांनी या आठवड्यात असे सांगितले होते की पहिला कसोटी सामना ऍडिलेड येथेच होणार याची कोणतीही हमी देता येणार नाही.
लॉकडाऊन झालं शिथिल
त्यानंतर ऍडलेड येथे होणारा पहिला कसोटी सामना सिडनी किंवा मेलबर्नमध्ये खेळला जाईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. परंतु शनिवारी(21 नोव्हेंबर) मध्यरात्रीपासून दक्षिण ऑस्ट्रेलियातील लॉकडाऊन शिथिल होणार आहे.
ऍडिलेड येथेच सामना होण्याची वाढली शक्यता
लॉकडाऊन शिथिल करण्याच्या निर्णयामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला थोडा दिलासा मिळाला आहे आणि कसोटी मालिकेचा पहिला सामना ऍडिलेड येथेच आयोजित करण्याची शक्यता वाढली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंचे करण्यात आले स्थानांतर
गेल्या आठवड्यात दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली होती. त्यामुळे सीमाबाहेर प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टिम पेनसह अनेक क्रिकेटपटूंना विमानाने न्यू साउथ वेल्समध्ये नेण्यात आले. पेन, मॅथ्यू वेड, मार्नस लबूशेन, जो बर्न्स, मायकल नासेर, कॅमरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, केन रिचर्डसन यांना विमानाद्वारे न्यू साऊथ वेल्स येथे हलवण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलिया-भारत मालिकेची आतुरता शिगेला! केवळ एका दिवसात संपली ‘या’ सामन्यांची तिकीटे
लॉकडाऊननंतर भारतात आयोजित पहिल्याच क्रिकेट स्पर्धेला कोरोनाचं ग्रहण; पुन्हा २ क्रिकेटपटू पॉझिटीव्ह
सामना संपल्यावर विराट थेट सुर्यकुमारकडे गेला अन् म्हणाला…