मेलबर्न | कोरोना या साथीच्या आजारामुळे मिळालेल्या विश्रांतीमुळे जवळपास सात महिन्यानंतर भारतीय संघ आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. 27 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जाईल. या सामन्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडू कसून सराव करत आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघात पुनरागमन करत असलेल्या एका फिरकीपटूला विश्वास आहे की देशांतर्गत क्रिकेट सामने खेळण्याचा अनुभवाचा फायदा त्याला आगामी मालिकेत होईल.
..तर वनडे आणि टी20 सामन्यात मिळते यश
ऑस्ट्रेलियाचा 27 वर्षीय फिरकीपटू ऍष्टन एगरने ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून खेळताना तीन सामन्यांत 10 बळी घेतले होते. त्याबद्दल बोलताना त्याने सांगितले की, “मी तीन शेफील्ड शिल्ड सामन्यांमध्ये जवळपास 150 षटके गोलंदाजी केली आहे. मी फलंदाजीसाठी उपयुक्त असलेल्या खेळपट्टीवरही गोलंदाजी केली आहे. जर अशा खेळपट्ट्यांवर फलंदाजांना बाद करण्याचा तुम्ही प्रयत्न केला, तर तुम्हाला वन डे आणि टी20 सामन्यात खरोखर यश मिळते.”
टी20 क्रिकेट खेळण्यात वाटतो आत्मविश्वास
मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेत वनडे सामना खेळल्यानंतर एगरने मर्यादित षटकांचा कोणताही सामना खेळला नाही. कारण कोव्हिड-19 या साथीच्या आजारामुळे स्थानिक लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती.
याबद्दल बोलताना एगर म्हणाला की, “हो मी बर्याच काळापासून मर्यादित षटकांचे सामने खेळलेलो नाही, पण मला याची चिंता वाटत नाही. वनडे संघात स्थान मिळविणे खूप कठीण आहे. टी20 क्रिकेट संघात निवड व्हावी म्हणून मी सर्व प्रयत्न केले. या स्वरूपात खेळताना मला अधिक आत्मविश्वास वाटतो.”
एगरची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द
कारकीर्दीत 13 वनडे सामन्यांमध्ये एगरने 10 बळी घेतले आहे आणि 27 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 30 बळी घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हताश होऊ नको, मेहनत कर’, ‘या’ खेळाडूला सचिनने पाठवला होता खास संदेश
‘हा’ खेळाडू भासू देणार नाही रोहितची कमतरता; ऑस्ट्रेलियन अष्टपैलूचे मत






