ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी संघाचा धडाकेबाज आणि महत्त्वपूर्ण खेळाडू डेविड वॉर्नर दुखापतग्रस्त झाल्याने पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले आहे की, मेलबर्नमध्ये होणाऱ्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीसाठी तो पुनरागमन करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल.
भारतीय संघाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना वॉर्नरला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. यामुळे त्याला लगेच मैदानाबाहेर जावे लागले होते. आणि सध्या वॉर्नर उपचार घेत आहे.
वॉर्नरने म्हटले की, “इतक्या कमी वेळेत मी बऱ्यापैकी ठीक झालो आहे. मी सिडनीमध्ये थांबून पूर्णपणे फीट होण्याचा प्रयत्न करतो, माझ्यासाठी हेच चांगले असेल.”
JUST IN: David Warner has been officially ruled out of the first #AUSvIND Test
Details: https://t.co/XXj2BGK2Zx pic.twitter.com/nguowxNVFR
— cricket.com.au (@cricketcomau) December 8, 2020
“आता दुखापतीतून बरा झाल्यासारखं वाटत आहे. परंतु मला स्वत:ला आणि आपल्या संघसहकाऱ्यांना हे सांगावे लागेल की मी कसोटीसाठी १०० टक्के तयार आहे,” असेही वॉर्नर पुढे म्हणाला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना १७ डिसेंबरपासून ऍडलेड येथे खेळण्यात येणार आहे. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असून गुलाबी चेंडूने खेळला जाणार आहे. यानंतर दुसरा सामना २६ डिसेंबरपासून लाल चेंडूने खेळला जाईल.
वॉर्नरच्या अनुपस्थितीत युवा फलंदाज विल पुकोवस्की कसोटी सामन्यात पदार्पण करण्याची शक्यता आहे. त्याने भारत अ संघाविरुद्धच्या सराव सामन्यात सहभाग घेतला होता. यादरम्यान त्याच्या हेल्मेटला चेंडू लागल्यानंतर त्याला मैदानाबाहेर जावे लागले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यातून विराट होऊ शकतो बाहेर, स्वत:च दिले संकेत
‘चार महिन्यांपासून मुलाचं तोंड नाही पाहिलं’, सामनावीर पुरस्कार पटकावणारा पंड्या भावूक
धडकी भरवणारा क्षण! कार्तिक त्यागीचा चेंडू लागला पुकोवस्कीच्या डोक्याला, अन् पुढे काय झालं पाहाच…
ट्रेंडिंग लेख-
अरेरे! क्रिकेट जगतावर राज्य करूनही कधीच रणजी ट्रॉफी न जिंकलेले ४ भारतीय दिग्गज
टीम इंडियाचे ३ धडाकेबाज गोलंदाज, ज्यांनी केली २०२० मध्ये वनडेत सर्वोत्तम कामगिरी
टॉप ३: २०२० मध्ये वनडेत सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे भारतीय शिलेदार; अव्वलस्थानी ‘हा’ खेळाडू