भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्याची बॉर्डर गावसकर मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना ब्रिस्बेन येथे खेळला जात आहे. हा सामना सध्या खूप रोमांचक स्थितीत आहे. कारण ऑस्ट्रेलिया संघाने तिसरा दिवस अखेर आपल्या दुसर्या डावाला सुरुवात केली आहे. त्यांनी तिसरा दिवसअखेर बिनबाद 21 धावा केल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ 54 धावांनी आघाडीवर आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया संघ मजबुत स्थितीत आहे. कारण ऑस्ट्रेलिया संघाकडे 10 विकेट्स आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया चौथ्या दिवशी मोठी धावसंख्या उभारून भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करेल.
या सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 33 धावांनी पिछाडीवर राहिला. यामुळे आता लोकांना भारताचा 2003-04 मधील ऑस्ट्रेलिया दौरा आठवत आहे. जेव्हा ऍडलेडमध्ये भारत पहिल्या डावानंतर 33 धावांनी पिछाडीवर असून सुद्धा हा सामना भारतीय संघाने जिंकला होता. त्यामुळे पुन्हा एकदा हा चमत्कार करून भारतीय संघ सामना जिंकणार का, असा चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे.
या 2003-04 च्या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात 4 कसोटी सामन्याची मालिका खेळली गेली होती. या मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेन येथे झाला होता, आणि तो अनिर्णित राहिला होता. त्यानंतर दुसरा सामना ऍडलेडमध्ये खेळला गेला होता. ज्यामध्ये रिकी पॉन्टिंगने दमदार द्विशतक करत ऑस्ट्रेलिया संघाला 556 धावांचा डोंगर उभारून दिला होता. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने पहिल्या डावात शानदार प्रदर्शन करताना 523 धावा केल्या होत्या. यामध्ये भारतीय संघाची भिंत या नावाने प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडने दमदार द्विशतक ठोकले होते. त्याचबरोबर व्हीव्हीएस लक्ष्मणने शतक ठोकले होते. त्याचबरोबर भारतीय संघ पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 33 धावांनी पिछाडीवर होता.
या सामन्यात भारतीय गोलंदाज अजित आगरकर याच्या दमदार गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलिया संघाचा दुसरा डाव 196 धावांवर आटोपला. त्यामुळे भारतीय संघाला दुसर्या डावात विजयासाठी 230 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. भारतीय संघाने या आव्हानाचा पाठलाग विरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर 6 विकेट्स गमावून हा सामना जिंकला होता. या डावात द्विशतक लगावलेल्या राहुल द्रविडला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.
हा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाचे जगभरातून कौतुक करण्यात आले होते. कारण भारतीय संघ पहिल्या डावात 33 धावांनी पिछाडीवर होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने या मालिकेतील तिसरा सामना 9 विकेट्सने जिंकला होता. जो मेलबर्न येथील क्रिकेट मैदानावर खेळला गेला होता. त्याचबरोबर चौथा सामना सिडनीत खेळला गेला होता. जो की अनिर्णित राहिला होता. ज्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळली गेलेली 4 कसोटी सामन्याची मालिका अनिर्णीत राहिली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: वॉशिंग्टन सुंदरने ठोकलेला उत्तुंग षटकार पाहून ‘या’ खेळाडूला झाली युवराजची आठवण
भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघाची ‘ही’ कमजोर बाजू; म्हणूनच मालिका रोमांचक, माजी दिग्गजाने मांडले मत
‘या’ भारतीयांचा कसोटी पदार्पणात नुसता धुराळा; केला ३ विकेट्स आणि अर्धशतक करण्याचा पराक्रम