ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात 26 डिसेंबरपासून तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. हा सामना मेलबर्न येथे खेळला जाणार आहे. चार सामन्याच्या या कसोटी मालिकेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहे.
तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याचे पुनरागमन झाले आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या एशिया कपमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात हार्दिक दुखापतग्रस्त झाला होता. तब्बल तीन महिन्यानंतर तो संघात परतला आहे.
यावेळी हार्दिकने ऑस्ट्रेलियामध्ये आल्यावर भारतीय संघासोबत सेल्फी काढला. हा फोटो त्याने ट्विटरवर शेयर करत त्याला ‘आतापर्यतचा सर्वोत्तम सेल्फी’ असे कॅप्शन दिले आहे’.
Best selfie ever 🤳 pic.twitter.com/dXGpWuV1co
— hardik pandya (@hardikpandya7) December 23, 2018
हार्दिक फिट असला तरी प्रशिक्षक रवी शास्त्री त्याला मेलबर्न कसोटीमध्ये खेळणार नसल्याची शक्यता आहे. दुखापतीतून सावल्यावर त्याने थोडेच प्रथम श्रेणीचे सामने खेळले आहेत.
“हार्दिकने दुखापतीतून सावल्यावर प्रथम श्रेणीचा फक्त एकच सामना खेळला आहे. यामुळे त्याच्याबद्दल विचार करून निर्णय घेण्याची गरज आहे”, असे शास्त्री म्हणाले.
रणजी ट्रॉफीमध्ये बडोद्याकडून खेळताना हार्दिकने मुंबईविरुद्धच्या सामन्यात 71 धावा करत 5 विकेट्स घेत अष्टपैलू कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–टीम इंडियाचे हे दोन प्रमुख खेळाडू मेलबर्न कसोटीला मुकणार ?
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १९- मुंबईचा ९११
–असा आहे बहुचर्चित बॉक्सिंग डे कसोटीचा इतिहास…