ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने दाखवलेल्या आक्रमक स्वभावाबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र माजी विंडीजचे दिग्गज क्रिकेटपटू सर विव रिचर्ड्स यांनी ‘मला विराटची नेतृत्व आवडते’ असे वक्तव्य केले आहे.
“भारतीय संघ काही पहिलेसारखा राहिला नाही. भारतीय संघात विराट सारखा खेळाडू आल्याने त्यांच्यात अनेक बदल झाले आहे. मला आक्रमकता आवडते आणि क्रिकेट त्यासाठीच आहे. मला विराटची आक्रमकता आवडते म्हणून मला त्याचे नेतृत्व आवडते”, असे रिचर्ड्स म्हणाले.
“विराटने केलेल्या आक्रमक नेतृत्वाबद्दल काहीच चुकीचे नाही. तो चांगला निकाल मिळण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. बाकीचे त्याच्या आक्रमकतेबद्दल बोलत असतील तर त्यांनी सध्याच्या भारतीय संघाच्या कामगिरीकडे बघावे. जगात भारतीय संघ सर्वोत्तम आहे”, असेही रिचर्ड्स म्हणाले.
सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेविषयी रिचर्ड्स यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे.
“भारतीय संघाने पहिली कसोटी जिंकत अव्वल का आहोत हे स्पष्ट केले आहे. मात्र ऑस्ट्रेलियाला कधीही कमी लेखू नये.”
“विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका जिंकण्याची संधी आहे. त्यांच्याकडे चांगले वेगवान गोलदांज आहेत”, असेही रिचर्ड्स म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
–आयपीएल लिलावात करोडपती झालेल्या खेळाडूला अश्विनने केला थेट आॅस्ट्रेलियावरुन काॅल
–कोहली-कुंबळे वादाबद्दल भारताच्या या दिग्गज खेळाडूने केला मोठा खूलासा
–टीम इंडियाला तिसरी कसोटी जिंकायची असेल तर हा शिलेदार संघात हवाच- मायकल हसी