ऑस्ट्रेलिया दौर्यावर हार्दिक पंड्याने दमदार फलंदाजी प्रदर्शन केले आहे. त्याने वनडे मालिकेत दोन वेळा महत्त्वपूर्ण 90 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यानंतरसुद्धा टी-20 मालिकेत त्याच्या बॅट मधून धावा निघत आहेत. हार्दिकची भारतीय कसोटी संघात निवड झाली नाही. असे असले, तरीही त्याने रविवारी (6 डिसेंबर) दुसरा टी-20 सामना भारतीय संघाला जिंकून दिला. त्याचबरोबर भारताला टी-20 मालिका जिंकून दिल्यानंतर मोठे वक्तव्य केले आहे.
मी माझ्या चुकांमधून शिकलो- पंड्या
तो म्हणाला, “मी काही वेळा अशा परिस्थितीत चुकलो आहे. आणि मी माझ्या चुकांमधून शिकलो आहे. मी आत्मविश्वासाने खेळतो आणि यामुळे स्वतःला प्रेरित करतो आणि अति आत्मविश्वास बाळगत नाही. मी नेहमी अशी वेळ लक्षात ठेवतो, जेव्हा आम्ही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला आहे आणि त्यामधून मदत मिळते.”
हार्दिक म्हणाला की, “जर भारतीय संघ व्यवस्थापनाला वाटत असेल मी कसोटी संघासोबत इथे थांबावे, तर यावर मला काही अडचण नाही.” त्याचबरोबर तो पुढे म्हणाला, लॉकडाऊनमध्ये मी सामना संपवण्याचे कौशल्य शिकून घेण्यावर काम केले आणि ते कौशल्य आत्मसात केले.
पाठीच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करून आल्यानंतर हार्दिक पंड्याने नियमितपणे गोलंदाजी केलेली नाही. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध मर्यादित षटकांत जोरदार प्रदर्शन केले आहे. ज्यामुळे भारतीय संघाने वनडे मालिका गमावल्यानंतर टी-20 मालिका जिंकली.
जेव्हा हार्दिक पंड्याला विचारण्यात आले की, तो 17 डिसेंबर पासून सुरू होणार्या कसोटी मालिकेसाठी थांबणार आहे का? त्यावर तो उत्तर देताना म्हणाला, “हा एक वेगळ्या प्रकारचा सामना आहे. मला वाटते मी येथे असायला हवे. माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की मला काही अडचण नाही, परंतु शेवटी हा निर्णय संघ व्यवस्थापनाचा आहे. त्यामुळे हो, मला नाही वाटत की मी यावर जास्त काही बोलू शकतो.”
भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक म्हणाला कोरोनाच्या काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये गरजेच्या वेळी सामना संपविण्याच्या कौशल्यावर मी काम केले आणि ते मी शिकून घेतले. रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने 22 चेंडूत दमदार 42 धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर या सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवून देत ही मालिका भारताच्या नावावर केली. त्यामुळे भारतीय संघाने या मालिकेत 2-0 या फरकाने विजयी आघाडी घेतली.
पंड्या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत म्हणाला, “लॉकडाऊनमध्ये गरजेच्या वेळी सामना संपवण्यावर लक्ष द्यायचे होते. मी जास्त धावा करू किंवा न करू हे महत्त्वाचे नाही.”
रविवारी सिडनीत भारतीय संघासाठी निर्माण झालेली परिस्थिती ही या फलंदाजासाठी नवीन नव्हती. त्याने मागील काही सामन्यात अशाच स्थितीतील सामने अनेकदा जिंकून दिले आहेत, तर काही सामन्यात पराभव पत्करावा लागला.
या सामन्यात सामनावीर ठरलेल्या हार्दिकने टी-20 मध्ये पदार्पण करणाऱ्या डॅनियल सॅम्सला दोन षटकार खेचत भारताला विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिक पंड्यापेक्षा ‘हा’ खेळाडू सामनावीर पुरस्काराचा खरा मानकरी, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे मत
स्टिव्ह वॉ यांच्या २१ वर्षीय मुलाने घेतला क्रिकेटमधून ब्रेक; भारताविरुद्ध खेळला होता सामना
कॅप्टन कोहलीचा नाद खुळा! असा ‘विराट’ कारनामा करणारा जगातील पहिलाच कर्णधार
ट्रेंडिंग लेख-
आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग