भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (6 डिसेंबर) ऑस्ट्रेलियाला 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 6 विकेट्सने पराभूत केले. याबरोबरच मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी भारतीय संघाने घेतली. भारताच्या या विजयानंतर ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टीन लॅंगरने भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याची तुलना भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू एमएस धोनीशी केली आहे.
लँगर यांनी हार्दिकने दुसर्या टी-20 सामन्यात खेळलेल्या नाबाद खेळीला अविश्वसनीय म्हटले आहे. हार्दिकने शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक खेळताना 22 चेंडूत तूफानी नाबाद 42 धावांची खेळी केली आणि भारताला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली.
लॅंगर सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, सामन्याच्या दृष्टीनेकोनातून अविश्वसनीय खेळी होती. आम्हाला माहित आहे की पंड्या किती घातक आहे. यापूर्वी आम्ही धोनीला हे करताना पाहिलंय आणि आज पंड्याने त्याच प्रकारची खेळी केली. त्याने या दौऱ्यात चांगली फलंदाजी केली आहे. उघड आहे की ही खेळी शानदार खेळी होती.
लॅंगर यांनी हे देखील मान्य केले की भारतीय संघात टी-20 मध्ये बरेच अनुभवी खेळाडू असल्याचा फायदा झाला. लॅंगरन म्हणाले, पूर्ण सामना अटीतटीचा होता. आमचे क्षेत्ररक्षण चांगले होते. टी-20 च्या अनुभवी खेळाडूंनी भरलेला संघ आमच्यावर भारी पडला.
पंड्याने निभावली उत्कृष्ट फिनिशरची भूमिका
दुसर्या टी-20 सामन्यात पंड्याने उत्कृष्ट फिनिशरची भूमिका निभावली. भारतीय संघाला शेवटच्या षटकात 14 धावांची गरज होती. पंड्याने या धावा फक्त पहिल्या 4 चेंडूत काढल्या आणि दोन चेंडू शिल्लक ठेवून भारताला विजय मिळवून दिला.
यंदाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आतापर्यंत हार्दिक पंड्याने दमदार फलंदाजी करताना सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने वनडे मालिकेत 90, 28 आणि 92 धावांची खेळी केली होती. त्याच्यामुळे भारतीय संघाने तिसरा वनडे सामना जिंकला होता. हार्दिक टी-20 मध्ये 16 आणि 42* धावांची खेळी केली. तिसरा टी-20 सामना मंगळवारी खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रेयस अय्यरसाठी वाढदिवस ठरला खास, एबी डिविलियर्सची केली बरोबरी
‘या’ ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचे पदार्पण ठरले खास; पहिल्याच सामन्यात विराट कोहलीला केले बाद
सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर दिसला हार्दिकचा ‘दिलदारपणा’, जिंकली चाहत्यांची मने