भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधे सुरू असलेल्या चार कसोटी मालिकेतील दोन सामने पार पडले. पहिल्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यांनंतर अजिंक्य रहाणेने विराटच्या अनुपस्थित भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यामुळे भारतीय संघाने अभिमानास्पद विजय मिळवला. या विजयानंतर अजिंक्य राहणेचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. यामध्ये आता प्रविण आमरे सहभागी झाले आहेत.
प्रविण आमरे हे अजिंक्य रहाणेचे प्रशिक्षक आणि सल्लागार राहिले आहेत. त्यामुळे प्रविण आमरे आपल्या विद्यार्थ्याच्या या यशाने आनंदित झाले आहे. त्याने आपल्या शिष्याचे तोंडभरून कौतुक केले आहे. प्रविण आमरे म्हणाले, शिष्याने आपली भूमिका चोख निभावली.
प्रविण आमरे म्हणाले, “मी फक्त फलंदाज अजिंक्य रहाणे सोबत काम केले आहे. कर्णधार आणि नेतृत्व करण्याची क्षमता ही त्याची स्वतःची आहे.” विराट कोहलीच्या गैरहजेरीत अजिंक्य रहाणेने भारतीय संघाचे नेतृत्व करतांना आपल्या गुणवत्तेची छाप सोडली.
प्रविण आमरे ‘टाईम्स ऑफ़ इंडिया’ सोबत बोलताना म्हणाले, “तो कर्णधार झाला याचे सर्व श्रेय त्याला देतो. अजिंक्य हा नेहमी रणनिती तयार असतो. तो क्रमांक 1 पासून 6 पर्यंत कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. त्याच्यासाठी नेहमी संघ पहिले प्राधान्य राहिले आहे.”
दुसर्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे केले. या सामन्यासाठी भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली रजेवर होता. तो पालकत्व रजा घेवून मायदेशी परतला आहे. त्यामुळे दुसर्या कसोटी सामन्यात नेतृत्व करण्याची माळ अजिंक्य राहणेच्या गळ्यात पडली. त्यामुळे अजिंक्य दुसर्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची धुरा सांभाळताना दिसला.
मेलबर्न येथे खेळण्यात आलेल्या दुसर्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेने नाणेफेक गमावून प्रथम क्षेत्ररक्षण करताना सर्व लोकांची मने जिंकली. त्याने आपल्या उत्तम नेतृत्वगुणाच्या सहाय्याने अप्रतिम क्षेत्ररक्षण लावले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव 195 धावसंख्येवर आटोपला. अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात फलंदाजी करताना 112 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारून आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसर्या डावात विजयी धाव घेत भारताला 8 विकेट्सने विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय महिला संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला कोरोनाचा फटका, २०२२ पर्यंत मालिका स्थगित
जागतिक कसोटी क्रमवारी: मेलबर्न कसोटीतील शतकाने रहाणेला फायदा, तर ‘हा’ खेळाडू पोहोचला अव्वलस्थानी
जागतिक कसोटी क्रमवारीत चमकले बुमराह-अश्विन, टॉप-१० मध्ये मिळवलं स्थान