कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगात क्रिकेट सामन्यांचे आयोजन होऊ शकले नाही. मात्र सर्व खबरदारी घेऊन जैव- सुरक्षित वातावरणात क्रिकेट सामने खेळले जात आहेत. अशा परिस्थितीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 27 नोव्हेंबर रोजी 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जाईल. या मालिकेच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगने ऑस्ट्रेलियाच्या एका अष्टपैलू खेळाडूचे तोंडभरून कौतुक केले आहे.
…त्याच्या कामगिरीत पाचपट सुधारणा
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिसची भारताविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी वनडे आणि टी20 संघात निवड झाली आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगचा असा विश्वास आहे की, मागील वर्षाच्या तुलनेत स्टॉयनिसच्या कामगिरीत बरीच सुधारणा झाली आहे. स्टॉयनिसबद्दल बोलताना पॉंटिंग म्हणाला की, “गेली दोन वर्षे त्याच्याबरोबर बराच वेळ घालवल्यानंतर जेव्हा मी त्याला आयपीएलमध्ये खेळताना पहिले, तेव्हा मला वाटले की तो १२ महिन्यांपूर्वी केलेल्या कामगिरीपेक्षा पाचपट चांगली कामगिरी करत आहे.”
चांगल्या कामगिरीच्या जोरावर स्टॉयनिसने केले पुनरागमन
गेल्या वर्षी झालेल्या 50 षटकांच्या विश्वचषकात निराशाजनक कामगिरी केल्यामुळे 31 वर्षीय स्टॉयनिसला ऑस्ट्रेलियाच्या टी20 संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्सकडून खेळताना त्याने शानदार कामगिरी केली होती. त्याच्या या कामगिरीच्या बळावर त्याने ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन केले.
स्टॉयनिसची बिग बॅश लीग मधील कामगिरी
बिग बॅश लीग 2019 मध्ये मार्कस स्टॉयनिसने 17 सामन्यात 705 धावा केल्या होत्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी होता.
आयपीएलमधील स्टॉयनिसची कामगिरी
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना स्टॉयनिसने 17 सामन्यात 352 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजी करत त्याने 13 बळीही घेतले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
मुलाच्या जन्मानंतर विराट पुन्हा परतणार ऑस्ट्रेलियात? मुख्य प्रशिक्षकाचे मोठे विधान