---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा घमंड भारताने वेळोवेळी तोडलाय..! India vs Australia रायवलरीचे किस्से

On: मंगळवार, जुलै 12, 2022 4:53 PM
---Advertisement---

आयपीएल संपल्यानंतर बोर होतंय म्हणून जुन्या इंटरनॅशनल मॅचेसच्या हायलाईट पाहत बसलो होतो. त्यात एक होती २०२१ मध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाला पटखनी दिलेली टेस्ट सिरीज. सलग दुसऱ्यांदा टीम इंडियाने अशी कामगिरी केलेली. मात्र, यावेळी काहीतरी स्पेशल होतं. ते म्हणजे ऑस्ट्रेलियाला ब्रिस्बेनच्या ग्राउंडवर पहिल्यांदा कोणीतरी टेस्ट मॅचमध्ये मात दिलेली. त्या मॅचची हिंदी कॉमेंट्री करताना,‌ विवेक राजदान यांनी वापरलेले शब्द होते.. टूटा है गाबा का घमंड… जीता है मुकाबला भारत… बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जायेगी गावस्कर के देश…

याच्यातील घमंड हा शब्द ऐकला की, ऑस्ट्रेलियन टीम समोर दिसते. आपल्याकडे काही जण म्हणत असतात आपण बेस्ट असलो की त्याचा थोडाफार घमंड आपल्याला असायलाच हवा. तशीच ऑस्ट्रेलियन टीम बेस्ट होती यात काही वाद नाही. पण तो घमंड त्यांना काही जास्तच होता आणि हाच घमंड भारताने अनेक वेळा उतरवला. क्रिकेट इतिहासातील या रायवलरीचे मागच्या दोन दशकातील काही किस्से पाहू…

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे खरेतर परंपरागत प्रतिस्पर्धी नाहीच. या रायवलरीची बीजे कोठे रोवली गेली असतील तर ती म्हणजे शारजात. १९९८ च्या त्याच कोका-कोला कप वेळी. सॅंड स्टॉर्मनंतर आलेले सचिनचे वादळ. आणि त्या वादळातून वाचल्यानंतर हे फायनलला ऑस्ट्रेलियाला अक्षरशः नामोहरम करणारी‌ सचिनची आणखी एक शतकी खेळी विसरणे केवळ अशक्य. इथच खर्‍या अर्थाने टीम इंडियाने ऑस्‍ट्रेलियाशी पंगा घ्यायला सुरुवात केली.

या रायवलरीचा पुढचा चॅप्टर लिहिला जाणार होता भारतात.‌ जसा सिकंदर सारे जग जिंकण्याच्या इराद्याने भारतात आला, अगदी तसाच स्टीव्ह वॉ १५ टेस्ट जिंकत भारतात आलेला. पहिली मुंबई टेस्ट जिंकत त्याने हा आकडा १६ पर्यंत नेला. टीम इंडियाला त्या टेस्टमध्ये हतबल झालेले पाहून, साऱ्यांना वाटले वॉ सलग १८ टेस्ट जिंकून आज घरी जाणार. पण, त्यांना माहीत नव्हतं की, वॉच्या नशिबात एवढच लिहिलंय. दुसरी टेस्ट कोलकात्यात झाली आणि पहिल्या दोन दिवसांतच पराभवाकडे चाललेल्या टीम इंडियाने अक्षरशः फिनिक्स भरारी घेतली. द्रविड लक्ष्मणची ऐतिहासिक पार्टनरशिप आणि त्यानंतर हरभजनने आपल्या स्पिनच्या जाळ्यात अडकवलेले कांगारू, वॉचा विजयरथ रोखण्यास पुरेसे होते. पुढची चेन्नई टेस्ट जिंकून टीम इंडियाने ऑस्‍ट्रेलियाला रिकाम्या हाताने मायदेशी पाठवले. सोबतच हे ऐलान देखील केले की, सौरभ गांगुलीच्या नेतृत्वातील ही टीम इंडिया ‘झुकेगी नही’.

ऑस्ट्रेलियाला बसलेला हा पहिला मोठा धक्का होता. मात्र हार मानेल ती ऑस्ट्रेलिया कसली? त्यांनी त्यापेक्षाही मोठी जखम टीम इंडिया आणि फॅन्सला दिली. वीस वर्षानंतर २००३ मध्ये टीम इंडिया वर्ल्डकप फायनलला पोहचली. समोर होती ऑस्ट्रेलिया. त्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियन कॅप्टन रिकी पॉंटिंग असा काही नडला की, भारतीयांचे विश्वविजयाचे स्वप्न त्याने चक्काचूर करून टाकले. आजही ती फायनल भारतीय क्रिकेट इतिहासातील एक वाईट दिवस म्हणून ओळखली जाते.

यानंतर चार वर्ष असं काही दोन्ही टीममध्ये घडलं नाही. हा एक घटना अशी मात्र झाली, ज्यामुळे भारतीयांचा ऑस्ट्रेलियन टीमवरील रोष आणखी वाढला. २००६ चॅम्पियन्स ट्रॉफी टिम इंडिया होस्ट करत होती. ब्रेबॉर्नवर झालेल्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला हरवत टूर्नामेंट जिंकली. मात्र, ज्यावेळी ट्रॉफी द्यायचा क्षण आला तेव्हा, ऑस्ट्रेलियन कॅप्टन रिकी पॉंटिंग याने मग्रूरीत, तत्कालीन अध्यक्ष शरद पवार यांना ‘द्या ती ट्रॉफी इकडे’ असे म्हटले. एवढ्यावर न थांबता त्यांना त्या स्टेजवरून बाजूला केले गेले. हा क्षण भारतीय कधीही विसरले नाही.

२००७ वनडे वर्ल्डकपमध्ये फियास्को झाला आणि टीम इंडिया लवकर बाहेर पडली. त्याच वर्षी टी२० वर्ल्डकपचा घाट घातला गेलेला. फेवरेट पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया. सारे सिनियर्स रेस्ट करत असताना, एमएस धोनीच्या यंगिस्तानने कोणाच्याही ध्यानी-मनी नसताना सेमी फायनल गाठली. सेमी फायनलला समोर होते मायटी ऑस्ट्रेलियन. मॅच आधीच ऑस्ट्रेलियाचा बड्याबड्या बाता मारणारा कॅप्टन रिकी पॉंटिंग म्हणाला, “प्रेशर आम्हाला माहीतच नाही, खरा प्रेशर तर त्यांच्यावर आहे”. बस इथेच घात झाला. टीम इंडिया पेटून उठली. याच वर्ल्डकपमध्ये सिक्सर किंग म्हणून ओळख मिळवलेला युवराज त्यादिवशी अक्षरशः ऑस्ट्रेलियन बॉलर्सवर तुटून पडला. ३० बॉलवर ७० रन्सची वादळ इनिंग त्यान खेळली. उथप्पा, धोनी आणि नवखा रोहितदेखील यात मागे राहिला नाही. १८९ च टारगेट पूर्ण करताना ऑस्ट्रेलिया झोकात खेळली खरी. पण, त्यांच्याच अग्रेशनचे उत्तर यावेळी इरफान पठाण, श्रीसंत आणि हरभजनने तोडीस तोड दिलं. वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवायची किमया टीम इंडियान करून दाखवली. तिन्ही आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे ऑस्ट्रेलियाचे स्वप्न, धोनीच्या यंगिस्तानने बेचिराख केले. पुढे भारत विश्वविजेता बनला.

जेव्हा जेव्हा ऑस्ट्रेलियाचा घमंड वाढतो तेव्हा टीम इंडिया समोर येते | Australia | India

त्याच वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया टूरवर गेल्यावर बकनर-पॉंटिंग यांनी दाखवलेली अखिलाडूवृत्ती. मंकी गेट प्रकरणात झालेला अभूतपूर्व राडा. या गोष्टी घडल्या. त्यातूनही पर्थ टेस्ट जिंकून टीम इंडियाने ‘हम किसीसे कम नही’. हे दाखवून दिलं.

जो वनडे वर्ल्डकप ऑस्ट्रेलियाला आपल्या हक्काचा वाटायचा, तो वर्ल्डकप त्यांच्याकडून हिसकावून घेण्याची किमयादेखील‌ भारताने केली. १९९९, २००३ आणि २००७ असे सलग तीन वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया जिंकली होती. २०११ चा वर्ल्डकपही त्यांच्या नजरेत होता. पण, क्वार्टर फायनलला समोर आली टीम इंडिया आणि तोच युवराज ज्याने २००७ टी२० वर्ल्डकपमध्ये असल्याचे स्वप्न भंग केलेले. अहमदाबादच्या मोटेरावर त्यादिवशी युवराज असा काही खेळला की, ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकपमधून बाहेर काढूनच थांबला.

२०१५ वर्ल्डकपच्या सेमीफायनलच महायुद्ध ऑस्ट्रेलियाने जिंकलं. पण सलग दोनदा ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाला टेस्ट सिरीज हरवण्याच, एकमेवाद्वितीय काम फक्त टीम इंडियाच करून दाखवू शकली. तेही, एकदम थाटात!!!

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

शिवसैनिकांनी जेव्हा खोदून टाकलेलं वानखेडेचं पिच; वाचा शिवसेनेचे क्रिकेटच्या मैदानावरही गाजलेले वाद

प्रतिभेला वयाची मर्यादा नसते! ८१व्या वर्षी माजी आमदाराने भारतासाठी जिंकली २ पदकं

ओव्हलचे मैदान कोण गाजवणार?, वाचा दोन्ही संघांची प्लेइंग११ आणि पिच रिपोर्ट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---