यंदाच्या टी20 विश्वचषकात रोहित शर्माच्य नेतृत्तवाखाली टीम इंडियाने आपल्या तिन्ही विभागात उल्लेखनीय कामगिरी करुन दाखवली आहे. यादरम्यान आज (24जून) रोजी प्रतिस्पर्धी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ सुपर-8 मधील आपल्या शेवटच्या सामन्यात भिडणार आहेत. हा सामना दोन्ही संघासाठी खूप महत्तवाचा असणार आहे.
टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघ आतापर्यंत अपारजित आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात देखील टीम इंडिया फायनल सोडून सर्व सामने जिंकली होती. पण 19 नोव्हेंबरच्या दिवशी कांगारुनी भारतीय संघाचे विश्वचषकाचे स्वप्न तोडलं होत. पूर्ण स्पर्धेत अपराजित असलेल्या टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाने फायनल मध्ये हरवले होते. तर आता भारत आज कांगारुना मात देऊन मागील हिशोब बरोबर करणार का? हे पहावं लागेल.
भारतीय भूमीवर खेळले गेलेल्या एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया विश्वविजेता ठरली होती. तत्तपूर्वी स्पर्धेत कांगारुनी अफगाणिस्तान विरुद्धचा अशक्य वाटणारा सामना एकतर्फी जिंकला होता. या सामन्यात संघाचा घातक फलंदाज गलेन मॅक्सवेलने द्विशतकीय खेळी खेळली होती. या पराभवानंतर अफगाणिस्तान संघ 2023 च्या विश्वचषकातून बाहेर पडला होता. पण यंदाच्या विश्वचषकात मात्र अफगाणिस्तानाने जोरदार पलटवार केला आहे. सुपर-8 च्या दुसऱ्या सामन्यात राशिद खानच्या संघाने ऑस्ट्रेलियावर 21 धावांनी विजय मिळवून कांगारुना सेमी फायनलसाठी अडचणीत आणला आहे. इंडिया देखील हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाला टी20 विश्वचषकातून बाहेर करुन 2023 च्या फायनलचा हिशोब चुकता करण्यासाठी मैदानात उतरणार का, हे पाहणं महत्वाचं राहिल.
टी20 विश्वचषक 2024 साठी दोन संघ सेमी फायनलसाठी आतापर्यंत पात्र ठरले आहेत. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ गट-2 मधून पात्र झाले आहेत. तर गट-1 मध्ये सेमी फायनलसाठी भारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघात चुरशीची लढत आहे.
महत्तवाच्या बातम्या-
टीम इंडियाचं सेमीफायनलमधील स्थान अजूनही पक्कं नाही, ऑस्ट्रेलिया करू शकते भारताला स्पर्धेबाहेर
मोठी बातमी! बीसीसीआयनं भाकरी फिरवली, आता टीम इंडियाला मिळणार नवा कर्णधार!
दक्षिण आफ्रिकेचा यजमानांना दे धक्का! सेमीफायलमध्ये मारली धडक