---Advertisement---

कोरोना इफेक्ट: टीम इंडियाची आणखी एक मालिका होऊ शकते रद्द

On: बुधवार, जुलै 15, 2020 12:21 PM
---Advertisement---

मुंबई । ऑक्टोबर महिन्यात भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टी20, वनडे आणि कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 11 ऑक्टोबर पासून टी20 मालिकेने या दौऱ्यास सुरुवात होणार आहे.

पण प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, टी20 मालिका रद्द होऊ शकते. ऑक्टोबर महिन्यात भारतीय क्रिकेट बोर्ड आयपीएलचे आयोजन करण्याच्या विचार आहे. त्यामुळे त्याचा परिणाम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पडू शकतो. त्यामुळे दौऱ्याच्या तारखेतही बदल करावा लागू शकतो.

बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन केले तर 11 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया मालिका होणे अवघड आहे. केवळ टी20 नाही तर 3 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेवरही त्याचा प्रभाव पडू शकतो.

त्यामुळे 10 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होऊ शकते. कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ सराव सामना खेळू इच्छितो. त्यामुळे कसोटी मालिकेच्या नियोजनातही बदल करावा लागणार आहे. नुकतेच आशिया चषक स्पर्धा स्थगित करण्यात आली आहेत. आयसीसीने टी20 विश्वचषकही स्थगित केला तर बीसीसीआय या वेळात आयपीएलचे आयोजन करू शकते.

भारत-ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेचे नियोजित वेळापत्रक –

11 ऑक्टोबर – पहिला टी20,  ब्रिस्बेन

14 ऑक्टोबर –  दुसरा टी20, कॅनबरा

17 ऑक्टोंबर – दुसरा टी20, ऍडिलेड

भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे नियोजित वेळापत्रक –

3 डिसेंबर – पहिला कसोटी सामना, ब्रिस्बन

11 डिसेंबर – दुसरा कसोटी सामना, ऍडिलेड

26 डिसेंबर – तिसरा कसोटी सामना, मेलबर्न

3 जानेवारी – चौथा कसोटी सामना, सिडनी

भारत ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेचे नियोजित वेळापत्रक

12  जानेवारी – पहिला वनडे सामना, पर्थ

15 जानेवारी – दुसरा वनडे सामना, मेलबर्न

17 जानेवारी – तिसरा वनडे सामना, सिडनी

ट्रेंडिंग घडामोडी – 

एमएस धोनीच्या शिफारशीमुळे ‘हा’ खेळाडू झाला मालामाल

लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी सोडून समाजसेवा करण्यात व्यस्त आहे या भारतीय क्रिकेटपटूची पत्नी

खुशखबर! इंग्लंडनंतर आता या देशात होणार क्रिकेटचे पुनरागमन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---