भारतीय संघाने तिसरा कसोटी सामना आर अश्विन आणि हनुमा विहारी यांनी केलेल्या चिवट खेळीमुळे अनिर्णित करण्यात यश मिळवले. या सामन्यात भारतीय संघाने पाचव्या दिवशी केलेल्या शानदार प्रदर्शनाने सर्वत्र कौतुक होत आहे. यावर आता ऑस्ट्रेलिया संघाचा फलंदाज मार्नस लॅब्यूशानेने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने भारताचे कौतुक केले आहे, पण याबरोबरच चौथा कसोटी सामन्यात भारतासमोर मोठे आव्हान ठेवू असेही संकेत दिले आहेत.
मार्नस लॅब्यूशाने म्हणाला, सिडनी कसोटीत पाचव्या दिवशी भारतीय संघाने ज्या प्रकारे तग धरून फलंदाजी केली. ही स्थिती बदलण्यासाठी ऑस्ट्रेलिया खेळाडूंकडे जास्त संधी नव्हती. परंतु ब्रिस्बेन येथे भारताला पराभूत करण्याचा प्रयत्न करू.
ऑस्ट्रेलिया संघाच्या या युवा फलंदाजाने तिसर्या कसोटी सामन्यातील पहिल्या आणि दुसर्या डावात अनुक्रमे 91 आणि 73 धावांचे शानदार योगदान दिले होते. तसेच ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला तिसरा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाकडून 407 धावांचे लक्ष्य दिले होते. यावेळी भारतीय संघातील रिषभ पंत, आर अश्विन, चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी यांच्या उत्कृष्ट कामगिरी भारतीय संघाने हा सामना अनिर्णीत राखला.
मार्नस लॅब्यूशाने क्रिकेट. डॉट. कॉम. एयू सोबत बोलताना म्हणाला, “सिडनी क्रिकेट मैदानात पाचव्या दिवशी खेळपट्टीवर मोठ्या प्रमाणात व्रण असतात. त्यामुळे खेळपट्टीवर चेंडू जास्त उसळी घेतो. परंतु जेव्हा कोणता संघ 131 षटके खेळतो, तेव्हा याचा अर्थ तो संघ खरोखरच चांगला खेळला आहे.”
लॅब्यूशाने म्हणाला, “त्यांनी चांगली फलंदाजी केली. ते शेवट पर्यंत टिकून राहिले आणि मला वाटते यामध्ये अजून काही बदल करू शकलो नसतो. आम्ही अनिर्णित सामना खेळलो. परंतु ही कसोटी मालिका आहे आणि येथे आम्ही जिंकण्यासाठी आहोत. या सामन्याचा निकाल काहीही लागलेला असू द्या. आम्ही येथे जिंकलो असतो मात्र अनिर्णित सामना राहिला. मात्र आता आम्हाला ब्रिस्बेनला जायचे आहे आणि जिंकायचे आहे. त्यामुळे आमच्यासाठी काही सुद्धा बदलले नाही. या ठिकाणी आम्हाला फक्त दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. आम्ही त्यांना ब्रिस्बेनमध्ये निश्चित पराभूत करू.”
तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाकडून दुसर्या डावात रिषभ पंतने 118 चेंडूचा सामना करताना 12 चौकार आणि 3 षटकार खेचत दमदार 97 धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर चेतेश्वर पुजाराने 205 चेंडूचा सामना करताना 12 चौकारांच्या सहाय्याने 77 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्यांनंतर अश्विन आणि विहारी यांनी चिवट फलंदाजी करतांना सामना अनिर्णीत राखला. दुसर्या डावात ऑस्ट्रेलिया संघाकडून जोश हेझलवूड आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्याचबरोबर पॅट कमिन्स याने 1 गडी बाद केला.
आता चौथा कसोटी सामना 15 जानेवारीपासून ब्रिस्बेन येथे सुरु होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता! सेहवाग म्हणतोय, ब्रिस्बेन कसोटी खेळण्यास तयार, फक्त ऑस्ट्रेलियाला जाण्याची सोय करा
“भारताविरुद्धची मालिका संपल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार बदलला तर मला आश्चर्य वाटणार नाही”
…म्हणून डेविड वॉर्नरने मागितली मोहम्मद सिराज आणि भारतीय संघाची माफी