ऑस्ट्रेलिया आणि भारत संघातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी (२९ नोव्हेंबर) सिडनी येथे झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेविड वॉर्नरला श्रेयस अय्यरने आपल्या रॉकेट थ्रोने शानदार पद्धतीने धावबाद केले. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
झाले असे की, नाणेफेक जिंकूण ऑस्ट्रेलिया संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यादरम्यान ऑस्ट्रेलियाकडून सलामीला डेविड वॉर्नर आणि ऍरॉन फिंच हे फलंदाजीस उतरले होते. यावेळी वॉर्नर (७८) आणि फिंचने (६०) पहिल्या विकेटसाठी १४२ धावांची भागीदारी रचली. फिंच ६० धावांवर बाद झाल्यामुळे स्टीव्ह स्मिथ फलंदाजीला आला. यावेळी एका बाजून वॉर्नरने आपल्या संघाचा डाव सांभाळला.
परंतु पुढे भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने, स्मिथ आणि वॉर्नरची जोडी तोडली. जडेजा टाकत असलेल्या डावातील २६ व्या षटकातील दुसरा चेंडू स्मिथने समोरच्या दिशेने फटकावला. या चेंडूवर वॉर्नरने पहिली धाव वेगाने घेतली गेली. परंतु दुसरी धाव घेताना भारतीय संघाचा धडाकेबाज खेळाडू श्रेयस अय्यरने चेंडू वेगाने नॉन स्ट्रायकर एन्डच्या दिशेने फेकला. तिथे जडेजा थांबला होता. त्यावेळी जडेजाने आपला पाय वर केला आणि चेंडू थेट स्टंपला लागला. त्यामुळे वॉर्नर धावबाद होत, ८३ धावांवर तंबूत परतला.
यादरम्यानचा व्हिडिओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.
What a throw from Iyer!
Watch live #AUSvIND on @FoxCricket and @kayosports: https://t.co/CTxq6E4aSW pic.twitter.com/Vp4mzOhTws
— cricket.com.au (@cricketcomau) November 29, 2020
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना बुधवारी (२ डिसेंबर) कॅनबेरा या मैदानावर होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Video – भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेदरम्यान डेविड वॉर्नरचे साऊथ इंडियन गाण्यावर थिरकले पाय
दुसऱ्या वनडे दरम्यान मैदानातच फिंच- केएल राहुलची मस्ती, पाहा व्हिडिओ
जिम सेक्शनमध्ये अश्विनने केली पुजाराच्या व्यायामाची नक्कल; Video जोरदार व्हायरल
ट्रेंडिंग लेख-
भारताविरुद्ध ५ वे शतक ठोकणाऱ्या स्मिथचे सचिन, पाँटिंगसारख्या दिग्गजांच्या यादीत स्थान
अफलातून! दुसऱ्या टी२० सामन्यात न्यूझीलंडच्या २३ वर्षीय फलंदाजाने शतकी खेळीसह केला भारी रेकॉर्ड
पाच नाही; सहा नाही, तब्बल १० देशांत कसोटी शतके करणारे जगातील २ फलंदाज