भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना बुधवारी (7 जून) सुरू झाला. लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियान संघ भक्कम स्थितीमध्ये आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ 296 धावांनी आघाडावीर आहे. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 4 बाद 123 धावा केल्या आहेत. मार्नस लाबुशेन आणि कॅमरून ग्रीन खेळपट्टीवर कायम आहेत.
डब्ल्यूटीसी फायनलच्या तिसरा दिवसाचा खेळ भारताने 5 बाद 151 धावांपासून पुढे सुरू केला. त्यावेळी अजिंक्य रहाणे आणि केएस भरत अनुक्रमे 29* आणि 5* धावांसह खेळपट्टीवर होते. तिसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या संघात भारतीय संघाचा पहिला डाव आटोपला. भारताने 69.4 षटकांमध्ये 296 धावां करून सर्व विकेट्स गमावल्या. पहिला डाव संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाकडे एकूण 173 धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात ही आघाडी वाढत चालली आहे.
तिसऱ्या दिवसाचा एकंदरीत विचार केला, तर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) भारतासाठी तारणहार ठरला. रहाणेला अवघ्या 11 धावा कमी पडल्यामुळे त्याचे शतक हुकले. त्याने 129 चेंडूत 89 धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या डावात गोलंदाजी विभागात कर्णधार पॅट कमिन्स सर्वात यशस्वी ठरला. कमिन्सने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. एकंदरीत पाहता भारतासाठी सामन्याचा तिसरा दिवस चांगला राहिला. मात्र, विजयाच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियन संघाचे पारडे अजूनही जड दिसत आहे.
ऑस्ट्रेलियन संघ शुक्रवारी (9 जून) दुसऱ्या सत्रात फलंदाजीसाठी आला आणि दिवसाचा खेळ संपेपर्यंत रविंद्र जडेजा याने दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. पहिल्या डावापेक्षा जडेजा या डावात अधिक प्रभाविपणे गोलंदाजी करताना दिसला. मागच्या सामन्यात भारतासाठी सर्वात मोठी बाधा ठरलेले स्टीव स्मिथ आणि ट्रेविस हेड यांना जडेजाने तंबूचा रस्ता दाखवला. सध्या खेळपट्टीवर लाबुशेन 41*, तर ग्रीन 7* धावा करून खेळपट्टीवर कायम आहेत.
अजून दोन दिवसांचा खेळ राहिला असून सामना निकाली निघण्यासाठी झटपट विकेट्स जाणे गरजेचे आहे. भारताला विजयासाठी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना लवकर बाद करावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ अशाच पद्धतीने आपली आघाडी वाढवत गेला, तर भारतासाठी विजय अशक्य होऊन बसेल. अशात शनिवारी (10 जून) पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाज कसे प्रदर्शन करतात, हे पाहण्यासारखे असेल. (India vs Australia WTC Philan, Australia lead by 296 runs at the end of the third day)
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
अर्रर्र! नव्वदच्या स्पीडने धावा काढत होता रहाणे, पण कॅमरून ग्रीन बनला स्पीडब्रेकर; पकडला अविश्वसनीय कॅच
मागच्या 10 वर्षांपासून टीम इंडिया का जिंकत नाहीये आयसीसी ट्रॉफी? हरभजन सिंगने स्पष्टच सांगितलं