---Advertisement---

विराट कोहलीला बाद करूनही ‘हा’ ऑस्ट्रेलियन गोलंदाज नाराज

On: शनिवार, डिसेंबर 5, 2020 9:04 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी२० मालिकेला काल (४ डिसेंबर) कॅनबेरा येथे सुरुवात झाली. भारताने यजमान ऑस्ट्रेलियाला ११ धावांनी पराभूत करत मालिकेत आघाडी घेतली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून खेळणाऱ्या फिरकीपटू मिचेल स्वेप्सन याने भारताचा कर्णधार विराट कोहलीचा बळी मिळविला. मात्र, विराटला बाद केल्यानंतरही स्वेप्सन खुश दिसला नाही.

स्वेप्सनने केली पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी

भारताविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात खेळताना स्वॅपसनने चमकदार कामगिरी केली. स्वॅपसनने सामन्यात दोन षटके गोलंदाजी करताना २१ धावा देऊन विराट कोहलीचा महत्त्वाचा बळी मिळवला. सामन्यानंतर सोनी स्पोर्ट्सशी बोलताना तो म्हणाला, “पहिल्या सामन्यातील कामगिरीने मी काहीसा निराश आहे. मी टाकलेले पहिले तीन चेंडू अत्यंत खराब होते. अखेर चौथ्या चेंडूवर विराटचा बळी मला मिळाला आणि माझ्यावरील दबाव कमी झाला.”

पहिल्या सामन्यातील आपल्या कामगिरीविषयी बोलताना स्वेप्सन पुढे म्हणाला, “आधी मी काहीसा उदास होतो. मात्र, कोहलीच्या बळीमुळे रोमांचित झालो. चांगली कामगिरी करण्याचा आता माझ्यावर दबाव आहे. विराटचा बळी मिळवण्याचा आनंद मात्र मी सांगू शकत नाही.”

एकाच वेळी ऑस्ट्रेलिया संघात दोन फिरकीपटू खेळू शकतात का? या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने सांगितले, “होय मी आणि ऍडम झाम्पा एकत्र खेळलो. सध्या आयपीएल असो नाहीतर बीबीएल किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट, या सर्वांमध्ये फिरकीपटूंनी चांगली कामगिरी केलेली आपण पाहिले आहे.”

सिडनी येथे खेळला जाईल दुसरा सामना

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यानच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना रविवारी (६ डिसेंबर) सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. मालिकेत आव्हान जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने यजमान ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल.

महत्त्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका; ‘हा’ खेळाडू टी२० मालिकेला मुकण्याची शक्यता

“त्या खेळाडूला पाहिल्यावर होते राहुल द्रविडची आठवण”

‘…तर तुम्ही कन्कशन सब्स्टिट्यूट घेण्यास पात्र नाही’, भारतीय दिग्गजाची नव्या नियमावर नाराजी

ट्रेंडिंग लेख-

‘कन्कशन सब्सटिट्यूट’ म्हणजे नक्की काय रे भाऊ?

पहिल्या टी२०मध्ये ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चित करण्यात या ५ भारतीय खेळाडूंनी बजावली मोलाची कामगिरी

अखेर तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर एमएस धोनीचे झाले होते कसोटी पदार्पण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---