रविवारी (3 नोव्हेंबर) दिल्ली (Delhi) येथे भारत विरुद्ध बांगलादेश (First T20Match India vs Bangladesh) संघात पहिला टी20 सामना पार पडला. या सामन्यात बांगलादेशने भारतावर 7 विकेट्सने विजय मिळवत 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
भारताच्या या पराभवानंतर गोलंदाज खलील अहमदला सोशल मिडीयावरून चाहत्यांनी ट्रोल केले आहे. या सामन्यात खलीलने 19व्या षटकांत 4 चौकारांबरोबर 18 धावा दिल्या. तसेच त्याच्या एकूण 4 षटकांमध्ये त्याने सर्वाधिक 37 धावा दिल्या. त्याच्या या कामगिरीमुळे चाहत्यांनी खलीलला भारताच्या पराभवासाठी जबाबदार ठरवले आहे.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 6 गड्यांच्या मोबदल्यात 148 धावा केल्या आणि बांगलादेशला विजयासाठी 149 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान बांगलादेशने मुशफिकुर रहिमने केलेल्या 60 धावांच्या जोरावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 19.3 षटकात सहज पार केले.
#IndvsBan #RishabhPant #khaleelahmed #INDvBAN
When almost everyone played bad, but you are being trolled the most:- pic.twitter.com/w8u342141k— Indian Memers League (@official_iml) November 3, 2019
@BCCI should drop Khaleel ahmed !
— Venkatesh reddy / ವೆಂಕಟೇಶ್ ರೆಡ್ಡಿ ???????? (@venkatesh_rvk14) November 3, 2019
सामना संपल्यानंतर भारतात ट्विटरवर खलील अहमद दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंडिग होता.
#IndvsBan Highlights of india vs Bangladesh 1st T20.
Rishabh Pant's DRS,
Krunal pandya's catch,
Khaleel ahmed's last over.— Saurav Ghosal (@SauravGhosal5) November 3, 2019
भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा 9वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना होता. यामध्ये बांगलादेशने पहिल्यांदा भारताला पराभूत केले होते. तसेच या दोन संघांमध्ये खेळण्यात आलेला हा सामना आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट प्रकारातील 1000 वा सामना होता.






