भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. भारताचा पहिला सामना 19 सप्टेंबरपासून सुरू झाला. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्यात बांग्लादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात चेपॉकवर महेंद्रसिंग धोनीच्या बालेकिल्यात विराटच्या नारेबाजीचे अनोखे दृश्य पाहायला मिळाले. तर यावेळी विराट कोहलीच्या प्रवेशावर ‘कोहली-कोहली’च्या घोषणा देण्यात आल्या. विराट कोहली दीर्घ काळानंतर कसोटीत परतला आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर पहिल्या डावात भारताची सुरुवात निराशाजनक झाली. भारताला सुरुवातीलाच दोन मोठे धक्के बसले. कर्णधार रोहित शर्माची विकेट प्रथम पडली. त्यानंतर शुबमन गिल देखील शून्यवर पॅव्हेलियनमध्ये परतला. शुबमन गिलनंतर विराट कोहली मैदानात आला. त्याच्या एंट्रीवर एमए चिदंबरम स्टेडियमवर चाहत्यांनी ‘कोहली-कोहली’चा नारा दिला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Gill out ho gaya but Indians seem to be happy..
That’s the king of reception Kohli got in Chepauk. @thebharatarmy behind the drums.@Cricketracker pic.twitter.com/XfevZTSJTh
— Koustav Sengupta (@KoustavOfficial) September 19, 2024
विराट कोहलीने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला पण तोही खेळपट्टीवर फार काळ टिकू शकला नाही. 10व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विराट कोहली 6 चेंडूत 6 धावा काढून बाद झाला. मात्र तो पॅव्हेलियनमध्ये परतत असतानाही स्टेडियममध्ये उपस्थित असलेले चाहते ‘कोहली-कोहली’च्या घोषणा देत होते.
भारतीय संघाच्या खराब सुरुवातीनंतर यशस्वी जयस्वाल आणि रिषभ पंत यांनी डाव सावरला. पण लंच ब्रेकनंतर परतल्यानंतर रिषभ पंत बाद झाला. त्याने संघासाठी महत्वपूर्ण 39 धावा करुन बाद झाला. हसन मेहमूदने रिषभ पंतला तंबूत पाठवले. तत्तपर्वी चाैथ्या विकेटसाठी यशस्वी जयस्वाल आणि रिषभ पंत यांनी 62 धावांची भागीदारी केली. तर पाचव्या विकेटसाठी केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी 48 धावांची भागीदारी केली. जयस्वाल 56 धावा करुन तर केएल 16 धावाकरुन तंबुत परतला. याबातमी आखेरीस भारतीय संघ 144-6 अश्या स्थितीत होता.
हेही वाचा-
चेन्नई कसोटीच्या पहिल्याच सत्रात भारताचं कंबरडं मोडणारा हसन मेहमूद कोण आहे?
‘केवळ 94 धावांनी शतक हुकलं…’, चेन्नई कसोटीत रोहित शर्मा फ्लॉप; सोशल मीडियावर चाहत्यांनी घेरलं
धोनीचा मोठा विक्रम आता धोक्यात, रिषभ पंतची वेगानं घोडदौड सुरु