---Advertisement---

चाहरने केला मोठा खूलासा, सीएसकेकडून खेळल्याने झाला हा मोठा फायदा

---Advertisement---

रविवारी (10 नोव्हेंबर) नागपूर (Nagpur) येथे भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात टी20तील तिसरा सामना (3rd T20 Match) पार पडला. पहिल्या दोन सामन्यात दोन्ही संघांनी 1-1 अशी बराबरी केली होती. त्यामुळे तिसरा सामना निर्णायक होता. या सामन्यात भारताने 30 धावांनी (Won by 30 Runs) बांगलादेशच्या संघाला पराभूत केले.

या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरने (Deepak Chahar) शेवटच्या षटकामध्ये हॅट्रीक घेत भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

या सामन्यानंतर भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने(Yuzvendra Chahal) चाहरची मुलाखत घेतली आहे. चहल टीव्ही नावाने होणाऱ्या या शोमध्ये भारतीय संघाचे विविध दौऱ्यामधील खेळाडूंच्या मुलाखती चहलने घेतल्या आहेत.

रविवारच्या सामन्यानंतर चहलने चाहरला त्याच्या गोलंदाजीबद्दल प्रश्न विचारले. यावेळी चाहरने कठीण परिस्थितीतही चांगली गोलंदाजी करण्याचे श्रेय चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) दिले आहे.

“चेन्नईमध्ये खेळताना, दव आणि घामाचा सामना कसा करावा हे मला कळले आहे. तसेच, गोलंदाजी करताना हात कसे स्वच्छ असायला पाहिजे. अशा वेळेस हातात कोरडी माती घेऊन हात कोरडे करावे, जेणेकरून हातातून चेंडू निसटणार नाही,” असे राजस्थानचा 27 वर्षीय वेगवान गोलंदाज चाहरने म्हटले आहे.

खेळपट्टीवर चेंडू स्विंग होत नव्हता, अशावेळी काय रणनीती होती, असे चहलने चाहरला विचारले.

या प्रश्नाला प्रतिउत्तर देताना चाहर म्हणाला, “व्हीसीए स्टेडियमची (VCA Stadium) बाऊंड्री लाईन खूपच मोठी होती. त्यामुळे फलंदाजांनी बाऊंड्री लाईनच्या दिशेने चेंडू मारावा यासाठी आम्ही त्यांच्यावर दबाव आणत होतो.”

“गोलंदाजी करताना मैदानावरील दवामुळे चेंडू ओला होत होता. चेंडू नीट पकडता येत नसल्यामुळे मी कमी- अधिक गतीने गोलंदाजी करत होतो,” असेही चाहर पुढे म्हणाला.

“मी हॅट्ट्रीक घेतल्याचे शेवटी कळाले. जर, तुम्ही घरी असाल तरी तूम्ही स्वप्नातही 4 षटकात 7 धावा देत 6 विकेट्स घेण्याचा विचारही नाही करू शकत,” असे म्हणत चाहरने त्याची कामगिरी स्वप्नवत असल्याचे सांगितले.

त्याचबरोबर मधल्या फळीत चाहरची गोलंदाजी न संपवता  त्याचा वापर वेगळ्या पद्धतीने केल्यामुळे चाहरने त्याचे श्रेय कर्णधार रोहित शर्मालाही दिले आहे.

“मला फक्त कठोर परिश्रम घेण्याची इच्छा होती. देवाच्या कृपेने मी इथे आहे. आज नव्या चेंडूने फ्रंटला गोलंदाजी करण्याची योजना होती.  मला सांगण्यात आले होते की मला निर्णायक षटके टाकायची आहेत. संघ व्यवस्थापनाने मला निर्णायक षटके टाकण्याची जबाबदारी दिल्यामुळे मी आनंदित आहे,” असे चाहर म्हणाला.

हा व्हिडियो बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड केला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---