14 नोव्हेंबरपासून भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात सुरु झालेला पहिला कसोटी सामना (First Test Match) शनिवारी (16 नोव्हेंबर) तिसऱ्या दिवशी संपला. या सामन्यात भारतीय संघ एक डाव आणि 130 धावांनी (Won By An Inning & 130 Runs) जिंकला.
या सामन्यात भारताचा वेगवान गोलंगाज मोहम्मद शमीने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. या सामन्यात पहिल्या डावात शमीने तीन विकेट्स घेतले. तर, दुसऱ्या डावात चार विकेट्स घेतले. त्याच्या या कामगिरीवर खूश होऊन भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी शमीची तुलना बिबट्याशी केली आहे.
या सामन्याच्या तिसर्या दिवशी समालोचन करताना गावसकर म्हणाले. “जेव्हा तो धावतो तेव्हा स्पायडर कॅम येत आहे असे दिसते. बिबट्या आपल्या शिकाराला मारण्यासाठी येत असल्यासारखे शमी दिसतो.”
“त्याची चेंडूची पकड आणि मनगटाची स्थिती चांगली आहे. शेवटच्या मिनिटांत तो कधीकधी चेंडू आत आणतो आणि काहीवेळा तो बाहेर काढतो. त्याच्या या गुणाचा त्याने आभ्यास केला आहे.”
29 वर्षीय शमी सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने 2019 या वर्षात आत्तापर्यंत क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये 68 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे तो या वर्षात सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. त्याच्यापुढे केवळ ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स आहे. त्याने 83 विकेट्स घेतले आहेत.
मयंक अगरवालने द्विशतकी खेळीनंतर अशाप्रकारे केले चाहत्यांना खूश, पहा फोटो
वाचा- https://t.co/DPVTDxCSrM#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi
@BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 16, 2019
दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी अशी असेल खेळपट्टी, गांगुलीने केला खूलासा
वाचा- 👉https://t.co/iBRVGpTxWP👈#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 16, 2019