भारतीय संघ 5 जून पासून विश्वचषक मोहिमेला सुरुवात करणार आहे. पण त्याआधी 1 जून रोजी टीम इंडीया बांगल्देश विरुद्ध सराव सामना खेळणार आहे. या सामन्यात सर्व खेळाडू चांगली कामगिरी करुन विश्वचषकात प्लेइंग 11 मध्ये आपले स्थान मिळवण्यासाठी नक्की प्रयत्न करतील. तर सराव सामन्यात कोणत्या खेळाडूंना संघाात स्थान मिळेल हे महत्तवाचे राहणार आहे. भारतीय संघातील विश्वचषकासाठी निवडलेल्या 15 खेळाडू हे आयपीएल संघाचे (फ्रेंचाइजी) नियमीत संघात खेळणारे (प्लेइंग 11) चे खेळाडू आहेत. विराट कोहली हा सामना खेळण्याची शक्यता कमी आहे.
आयपीएलनंतर संघातील बहुतांश खेळाडूंना आठवड्यांची विश्रांती मिळाली आहे. अशा परिस्थितीत सर्व खेळाडूंना त्यांची लय दाखवण्याची ही संधी असेल. कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना संघ निवडण्यासाठी कस लागणार आहे.
भारतीय संघ न्यूयाॅर्क येथील नासाउ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सराव सामना खेळणार आहे. सामन्यादरम्यान न्यूयॉर्कमधील तापमान 28 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. दिवसा आकाश सामान्यतः निरभ्र असेल आणि रात्री अंशतः ढगाळ राहील. पावसाची शक्यता सकाळी 1% असते आणि रात्री 4% आहे. अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार ), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सैमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पांड्या (उपकर्णधार) रवींद्र जडेजा,अक्षर पटेल,कुलदीप यादव,जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज,आर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल
राखिव खेळाडू- शुबमन गिल, रिंकु सिंग, खलिल अहमद,आवेश खान
महत्तवाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकासाठी ‘हा’ संघ आहे प्रबळ दावेदार गाठू शकतो अंतिम फेरी
टी20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यावरच पावसाच सावट! टेक्सासमध्ये दररोज पडतोय पाऊस
मेगा लिलावात इतकेच खेळाडू कायम ठेवता येतील, संघांना बसला धक्का!