भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात इंदोर होळकर क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 1 डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला.
आता या सामन्यानंतर आता 22 नोव्हेंबरपासून कोलकाता येथे होणाऱ्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याकडे लक्ष वेधले गेले आहे. हा सामना दिवस-रात्र असल्याने गुलाबी चेंडूने खेळला जाणार आहे. यापूर्वी भारत गुलाबी चेंडूने कधीही सामना खेळलेला नाही. तसेच बहुतेक क्रिकेटपटूंचाही गुलाबी चेंडूने खेळण्याचा पहिलाच अनुभव असेल.
त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंसाठी संघव्यवस्थापनाने यापूर्वीच गुलाबी चेंडूंसह सराव सत्रांचे आयोजन करण्यास सुरवात केली आहे.
कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या सरावसत्रातून सहभागी झाले होते. त्याचबरोबर, पहिल्या कसोटीनंतर मोहम्मद शमी (Mohammed Shami), इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि उमेश यादव (Umesh Yadav) या तिघांनाही ब्रेक देण्यात आला होता.
पण चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), आर अश्विन (R Ashwin) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) रिषभ पंत (Rishabh Pant), हनुमा विहारी (Hanuma Vihari), शुबमन गिल (Shubman Gill) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांनीही गुलाबी चेंडूने खेळण्याचा सराव केला आहे.
या वेळी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri), फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड (Vikram Rathoure) आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर (R Sri Dhar) यांचा समावेश असलेले सपोर्ट स्टाफ सदस्य(Support Staff) स्टेडियमवर उपस्थित होते.
भारतीय खेळाडू गुलाबी चेंडूने सराव करत असलेला व्हिडिओ बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे.
Getting ready for the Pink ball Test be like 😍😎 #TeamIndia #INDvBAN pic.twitter.com/BtwfEwFKwN
— BCCI (@BCCI) November 17, 2019
तसेच या सामन्यासाठी कोलकाता शहर गुलाबी रंगाने रंगले आहे. तसेच, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI President Sourav Ganguly) यांच्या हस्ते या सामन्याचा शुभंकर(Mascots) ‘पिंकू-टिंकू’ (Pinku-Tinku)चे अनावरण करण्यात आले आहे. गांगुलीने ईडन गार्डनवर सामन्याचे तिकीट आणि शुभंकर बरोबर फोटो घेतले.
#EdenGardens Spicing up for Pink Ball Test.#CAB pic.twitter.com/x2iGYoyLAc
— CABCricket (@CabCricket) November 17, 2019
या खेळाडूने केले अवघ्या १४ चेंडूत अर्धशतक करत रचला मोठा विक्रम
वाचा👉https://t.co/LrcN9Wg3g6👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) November 19, 2019
व्हिडिओ: भावाचा झेल घेण्याच्या नादात या क्रिकेटपटूने फोडून घेतले नाक!
वाचा👉https://t.co/uarWMRylLu👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 19, 2019