भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. बीसीसीआयची निवड समिती लवकरच या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करेल. मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर होईल.
दोन्ही देशांमधील कसोटी क्रिकेटचा इतिहास 2 दशकांहून जुना आहे. गेल्या 24 वर्षांत या दोन देशांदरम्यान एकूण 13 कसोटी मालिका खेळल्या गेल्या. यामध्ये भारतीय संघाचंच वर्चस्व राहिलं. यापैकी बहुतेक मालिका बांगलादेशमध्येच खेळल्या गेल्या.
भारत आणि बांगलादेशमध्ये पहिला कसोटी सामना 10 नोव्हेंबर 2000 रोजी खेळला गेला. त्या मालिकेतील हा एकमेव कसोटी सामना होता. ढाका येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतानं 9 गडी राखून विजय मिळवला होता. त्यावेळी सौरव गांगुली भारताचा कर्णधार होता.
तेव्हापासून भारत आणि बांगलादेशमध्ये एकूण 8 मालिका झाल्या आहेत. या आठ मालिकांपैकी भारतानं सात मालिका जिंकल्या. 2015 मध्ये दोन्ही देशांमधील एकमेव मालिका अनिर्णित राहिली होती. 24 वर्षांच्या कालावधीत दोन्ही देशांदरम्यान एकूण 13 कसोटी सामने खेळले गेले. यापैकी भारतानं एकूण 11 सामने जिंकले असून 2 (2007, 2015) अनिर्णित राहिले.
भारत आणि बांगलादेश यांच्यात शेवटची कसोटी मालिका डिसेंबर 2022 मध्ये झाली होती. तेव्हा भारतीय संघाचं नेतृत्व केएल राहुलकडे होतं. चितगाव आणि मीरपूर येथे झालेल्या या दोन्ही कसोटी भारतानं जिंकल्या होत्या. याचाच अर्थ गेल्या 24 वर्षांत बांगलादेश भारताविरुद्ध एकही कसोटी सामना जिंकू शकलेला नाही.
परंतु यावेळेस बांगलादेशला पराभूत करणं भारतीय संघासाठी तितकं सोपं नसेल. कारण बांगलादेशनं नुकताच पाकिस्तानच्या त्यांच्याच मायदेशात कसोटी मालिकेत पराभव केला आहे. बांगलादेशनं पाकिस्तानविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिका
2000 – बांगलादेश यजमान, भारत 1-0 ने विजयी
2004 – बांगलादेश यजमान, भारत 2-0 ने विजयी
2007 – बांगलादेश यजमान, भारत 1-0 ने विजयी (1 सामना अनिर्णित)
2010 – बांगलादेश यजमान, भारत 2-0 ने विजयी
2015 – बांगलादेश यजमान: 0-0 (ड्रॉ)
2017 – भारत यजमान, भारत 1-0 ने विजयी
2019 – भारत यजमान, भारत 2-0 ने विजयी
2022 – बांगलादेश यजमान, भारत 2-0 ने विजयी
हेही वाचा –
दुलीप ट्रॉफीमध्ये आरसीबीच्या गोलंदाजाचा कहर, पहिल्याच सामन्यात घेतल्या 9 विकेट
दुलीप ट्रॉफीमध्ये खळबळ! युवा यष्टीरक्षकानं केली धोनीच्या 20 वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी
राहुलला डच्चू, पंतला संधी? बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी असा असू शकतो भारतीय संघ